Video : लखनौला झटका, कर्णधार फक्त 6 धावा काढून आऊट, पाहा डी कॉकचा 93 मीटरचा षटकार
लखनौला पहिला झटका बसला असून संघाचा कर्णधार केएल राहुल आऊट झालाय. त्याने 11 चेंडूत फक्त सहा धावा काढल्या आहेत.

मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघामध्ये सामना सुरू आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येथे आयपीएलच्या 42 व्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकलाय. तर लखनौचा संघ फलंदाजी करत आहे. मात्र, लखनौला पहिला झटका बसला असून संघाचा कर्णधार केएल राहुल आऊट झालाय. त्याने 11 चेंडूत फक्त सहा धावा काढल्या आहेत. त्यात त्याने एक चौकार लगावलाय. लखनौचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाने पाच सामने जिंकले आहेत, तर तीन पराभवाचा सामना केलाय. पंजाब संघाने आठ सामन्यांत चार विजय आणि तितक्यात सामन्यात पराभवाचा सामना केलाय. सुपर जायंट्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभूत केलं होतं. तर पंजाब किंग्ज संघ चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव केला होता. पंजाबसमोर विजयाची घोडदौड कायम राखण्याचं लखनौचं मोठं आव्हान असणार आहे. मात्र, कर्णधार आऊट झाल्याने डॉ कॉकचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय.
लखनौला पहिला झटका
Rabada strikes!
Gets the big wicket of KL Rahul.
Live – https://t.co/H9HyjJPgvV #PBKSvLSG #TATAIPL pic.twitter.com/kHTvMQEnQV
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2022
केएल राहुलची विकेट. VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
डी कॉकच्या षटकाराची चर्चा
आजच्या सामन्यात लखनौ फलंदाजीसाठी मैदानात उतरला असून केएल राहुल 11 चेंडूत फक्त सहा धावा काढल्या आऊट झालाय. यामुळे डी कॉककडे आता संघाला चांगल्या धावा काढून द्यायची जबाबदारी आहे. दरम्यान, डी कॉकने एक षटकार तब्बल 93 मीटरचा मारला आहे. चौथ्या ओवरच्या तिसऱ्या बॉलमध्ये डी कॉकने हा षटकार मारलाय.
षटकाराची चर्चा तर होणारच!
Match 42. 4.3: Kagiso Rabada to Quinton De Kock 6 runs, Lucknow Super Giants 29/1 https://t.co/fhL4hIBMWr #PBKSvLSG #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2022
डी कॉकचा 93 मीटरचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लखनौ सुपर जायंट्सच्या सीईओचा अपघात
सामन्या सुरू होण्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचे सीईओ रघू अय्यर, त्यांची सहाय्यक रचिता बेरी आणि गौतम गंभीरचा व्यवस्थापक गौरव अरोरा यांचा कार अपघात झाला. लखनौचा संघ सामन्यासाठी स्टेडियमकडे जात असताना हे वृत्त आलं. दरम्यान, सर्वकाही ठीक असल्याची माहिती आहे.
लखनौ सुपर जायंट्सचं ट्विट
Lucknow Super Giants’ CEO Raghu Iyer, his associate Rachita Berry and Gaurav Arora, Manager for Gautam Gambhir were involved in a minor road accident en route to the venue for tonight’s game. Fortunately, all three are safe and well. pic.twitter.com/NoWHmN0MOl
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 29, 2022
2022
