IPL 2021: केकेआरच्या स्टार खेळाडूच्या घरी आला नवा पाहुणा, आता ट्रॉफीही येणार का?

आरसीबीला मात देत केकेआर संघाने अंतिम सामन्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. आता त्यांनी फक्त दिल्ली कॅपिटल्सला नमवताच ते अंतिम सामन्यात पोहोचतील.

IPL 2021: केकेआरच्या स्टार खेळाडूच्या घरी आला नवा पाहुणा, आता ट्रॉफीही येणार का?
केकेआर संघ

IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स संघाने (KKR) अखेरच्या काही सामन्यांत केलेल्या अप्रतिम प्रदर्शनामुळे अंतिम सामन्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. आता फक्त दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाला नमवताच ते अंतिम सामन्यात पोहोचतील. दरम्यान संघासाठी ही आनंदाची बातमी असताना संघातील एका खेळाडूच्या घरीही आनंदाची बातमी आली आहे. दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) बाबा झाला आहे. त्याची जोडीदार बेकी बॉस्टनने एका मुलाला जन्म दिला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज खेळाडूने आपल्या मुलाचं नाव एल्बी बॉस्टन कमिन्स असं ठेवलं आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे वडील झाल्याची माहिती दिली आहे. त्याने इन्स्टा पोस्टमध्ये, बेकी प्रेग्नेंट झाल्यापासून ते तिला मुल होईपर्यंत सर्व फुटेज आहे. त्याने एक ब्लॉग करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्याची इन्स्टा पोस्ट सध्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pat Cummins (@patcummins30)

आयपीएल मधूनच सोडली

अतिशय मोठ्या किमतीला केकेआरने पॅटला विकत घेतले होते. त्याने काही सामन्यात चांगली कामगिरी देखील केली. पण भारतात आयपीएल रद्द झाल्यानंतर तो मायदेशी परतला. ज्यानंतर युएईमध्ये खेळण्याची इच्छ नसल्याचं सांगत फॅमिलाला टाईम देण्यासाठी त्याने आय़पीएलमध्येच सोडली. आता पुढील वर्षी केकेआर त्याला रिटेन करणार का? हे पाहावे लागेल.

टी20 विश्वचषकालाही उशीरा पोहोचणार

आगामी टी20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ 8 ऑक्टोबरला दुबईला पोहोचला आहे.  पण पॅट मात्र या खुशखबरीमुळे संघासोबत न जाता 12 ऑक्टोबरला सायंकाळी जाणार आहे. त्यानंतर सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपवून तो सरावाला सुरुवात करेल. ऑस्ट्रेलियासा न्यूझीलंडसोहबत 18 ऑक्टोबरला पहिला वॉर्म अप सामना खेळायचा आहे.

हे ही वाचा-

धोनीचं प्लॅनिंग, विराटची अंमलबजावणी, T-20 World Cup मध्ये भारत धमाका करणार; दिग्गजाची भविष्यवाणी

IPL 2021 मधला RCB चा प्रवास संपुष्टात, ग्लेन मॅक्सवेलने शेअर केली मन की बात, ‘त्या’ लोकांना इशारा

IPL 2021 : या खेळाडूमुळे विराटचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं, RCB च्या पराभवाचा सगळ्यात मोठा व्हिलन!

(KKR Bowler Pat Cummins becomes father with baby boy)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI