KKR vs LSG IPL 2022: KKR ला आज जिंकावच लागेल, विजयासाठी 177 धावांचे टार्गेट

राहुल आऊट झाल्यानंतर डि कॉकने ऑलराऊंडर दीपक हुड्डाच्या साथीने डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली.

KKR vs LSG IPL 2022:  KKR ला आज जिंकावच लागेल, विजयासाठी 177 धावांचे टार्गेट
lsg vs kkr
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 07, 2022 | 9:39 PM

मुंबई: लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (LSG vs KKR) आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर सामना सुरु आहे. आयपीएलमधला (IPL) हा 53 वा सामना आहे. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेतली. लखनौचा कर्णधार केएल राहुल पहिल्याच ओव्हरमध्ये रनआऊट झाल्यानंतर लखनौचा संघ बॅकफूटवर जाईल असं वाटलं होतं. आज राहुल लवकर बाद झाला म्हणून फरक पडला नाही. दुसरा सलामीवीर क्विंटन डि कॉकने ती जबाबदारी निभावली. त्याने 29 चेंडूत 50 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार होते. राहुल आऊट झाल्यानंतर डि कॉकने ऑलराऊंडर दीपक हुड्डाच्या साथीने डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. डि कॉकला सुनील नरेनने शिवम मावी करवी झेलबाद केलं. दीपक हुड्डानेही चांगली फलंदाजी केली. त्याने 27 चेंडूत 41 धावा करताना चार चौकार आणि दोन षटकार लगावले.

स्टॉयनिसची फटकेबाजी

कृणाल पंड्या (25), आयुष बदोनी नाबाद (15) आणि मार्कस स्टॉयनिसने 14 चेंडूत (28) धावा केल्या. स्टॉयनिसने अखेरीस फटकेबाजी केली. त्याने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. त्यामुळे लखनौने निर्धारित 20 षटकात सात बाद 176 धावा केल्या. केकेआरकडून शिवम मावी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार ओव्हर्समध्ये 50 धावा देत एक विकेट काढली.

KKR ला जिंकावच लागेल

आजच्या सामन्यात उमेश यादव दुखापतीमुळे खेळत नाहीय. त्याच्याजागी केकेआरने हर्षित राणाला संधी दिली आहे. केकेआरला आजच्या सामन्यातगी विजय आवश्यक आहे. कारण पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ 10 सामन्यात चार विजय आणि सहा पराभवासह आठव्या स्थानावर आहे. प्लेऑफचं आव्हान टिकवून ठेवण्य़ासाठी केकेआरला विजय मिळवणं आवश्यकच आहे. लखनौची टीम 14 पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या ते उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे आजचा सामना लखनौपेक्षा पण केकेआरसाठी जास्त महत्त्वाचा आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें