AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul : केएल राहुलचं मोठं विधान! ‘अशा सामन्यांसाठी जास्त मोजले पाहिजे’ नेमका संदर्भ काय?

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला.

KL Rahul : केएल राहुलचं मोठं विधान! 'अशा सामन्यांसाठी जास्त मोजले पाहिजे' नेमका संदर्भ काय?
केएल राहूलImage Credit source: social
| Updated on: May 19, 2022 | 3:23 PM
Share

मुंबई :  कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (KKR vs LSG) नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 210 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुले LSG ची टीम सहज सामना जिंकेल, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण प्रत्यक्षात मैदानात मात्र दुसरच घडलं. शेवटच्या चेंडूपर्य़ंत हा सामना रंगला. लखनौ सुपर जायंट्सने अवघ्या 2 रन्सनी सामना जिंकून प्लेऑफमध्ये (Playoff) धडक मारली. रिंकू सिंहमुळे (Rinku Singh) केकेआरचा संघ सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये पोहोचला होता. 17 व्या षटकात केकेआरची धावसंख्या 150 असताना आंद्रे रसेल आऊट झाला. सर्वांना वाटलं सामना लवकर संपणार. पण रिंकू सिंहने सामन्यात जान आणली. त्याने तुफान खेळ दाखवला. शेवटच्या 20 ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर लुईसच्या अविश्वसनीय झेलमुळे लखनौला सामना जिंकता आला. दरम्यान, या सामन्यादरम्यान केएल राहुलनं एक महत्वाचं वक्तव्य केलंय. ते नेमकं काय वक्तव्य आहे. ते पुढे जाणून घ्या…

राहुल नेमकं काय म्हणाला?

राहुल सामन्यानंतर म्हणाला, ‘कदाचित अशा सामन्यांसाठी मला जास्त पैसे मिळावेत. या मोसमात आम्ही असे सामने गमावले आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले बरेच सामने झालेले नाहीत. आम्ही हा सामना जिंकू शकलो याचा आनंद आहे. आम्ही हा सामना गमावू शकलो असतो आणि नंतर आम्ही खराब क्रिकेट खेळल्याप्रमाणे मैदानातून परतलो.

राहुलकडून लुईसचं कौतुक

राहुल पुढे म्हणाला, ‘लीगचा शेवटचा सामना अशा प्रकारे जिंकणे चांगले होते. श्रेय दोन्ही संघांना जाते की त्यांनी इतका चांगला सामना खेळला. मला वाटते की आम्ही चांगले होतो, शेवटच्या दोन चेंडूत तीन धावा शिल्लक होत्या. आम्ही चांगली फलंदाजी केली. एविन लुईसचा तो झेल अप्रतिम होता. मोहसीन खानने गेल्या काही सामन्यांमध्ये आमच्यासाठी चांगला खेळ दाखवला आहे, तो ज्या पद्धतीने खेळत आहे, तो लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. या विजयासह लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. आता उर्वरित दोन जागांसाठी पाच संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले असतील. पण तरीही ते उर्वरित संघांची समीकरणे बिघडू शकतात. लखनौ सुपर जायंट्सच्या दोन धावांनी रोमहर्षक विजयानंतर केएल राहुलने गमतीने सांगितले की अशा सामन्यांसाठी मला अतिरिक्त पैसे मिळायला हवेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.