AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 1st ODI: टीम इंडियाने शोधली ऋषभची रिप्लेसमेंट! पहिल्या वनडेमध्ये घेणार त्याची जागा

IND vs SL 1st ODI: वनडे वर्ल्ड कप 2023 लक्षात घेऊन टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजपासून ऋषभ पंतची रिप्लेसमेंट शोधण्याचा प्रयत्न करेल. पंतची जागा कोण घेणार? ते रोहितने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलय.

IND vs SL 1st ODI: टीम इंडियाने शोधली ऋषभची रिप्लेसमेंट! पहिल्या वनडेमध्ये घेणार त्याची जागा
Rishabh pant Image Credit source: AFP
| Updated on: Jan 10, 2023 | 10:54 AM
Share

Rishabh Pant Replacement: टीम इंडिया नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वनडे वर्ल्ड कप 2023 चा तयारी सुरु करणार आहे. वर्ल्ड कप एक मोठी टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटच्या निमित्ताने चाहत्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. सध्या ऋषभ पंत दुखापतग्रस्त आहे. त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न आहे. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजच्या पूर्वसंध्येला काल पत्रकार परिषद झाली. त्यात रोहितने काही गोष्टी स्पष्ट केल्या. पंतची जागा कोण घेणार? हे त्याच्या उत्तरातून कळलं.

पंतची जागा घेणार हा खेळाडू

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या कारला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभला मैदानावर परतण्यासाठी कमीत कमी 8 ते 9 महिने लागू शकतात. त्यामुळे येणाऱ्या दिवसात विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुल भारतीय सिलेक्टर्सची पहिली पसंत असेल.

रोहितने भूमिका स्पष्ट केली

भारतीय सिलेक्टर्सनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी विकेटकीपर म्हणून केएल राहुल आणि इशान किशन यांचा टीममध्ये समावेश केलाय. रोहितने पत्रकार परिषद स्पष्ट केलं की, इशान किशन प्लेइंग 11 चा भाग नसेल. त्यामुळे केएल राहुल पुढच्या काही सामन्यात विकेटकीपर म्हणून टीममध्ये खेळताना दिसेल.

आधी सुद्धा विकेटकीपर म्हणून खेळलाय

केएल राहुल या सीरीजआधी काहीवेळा विकेटकीपर म्हणून टीम इंडियामध्ये खेळला आहे. या सीरीजमध्येही तो याच रोलमध्ये दिसेल. केएल राहुलच्या बॅटिग ऑर्डरमध्येही बदल दिसेल. तो बऱ्याचदा रोहित शर्मासोबत ओपनिंगला दिसला होता. पण आता तो मीडिल ऑर्डरमध्ये दिसेल. वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.