IPL Final 2021 KKR vs CSK: अंतिम सामन्यात कोलकात्यासमोर चेन्नईचं आव्हान, असा आहे Head to Head रेकॉर्ड

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील अंतिम सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. केकेआर आणि सीएसके दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले असले तरी एकच विजेता आपल्याला मिळणार आहे.

IPL Final 2021 KKR vs CSK: अंतिम सामन्यात कोलकात्यासमोर चेन्नईचं आव्हान, असा आहे Head to Head रेकॉर्ड
केकेआर विरुद्ध सीएसके

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाचा आज अंतिम सामना आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) या संघामध्ये खेळवला जाणाऱ्या या सामन्यासाठी अवघा देश उत्सुक आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात धोनीची टोळी कोलकात्याच्या रायडर्सना मात देत आपलं चौथं जेतेपद पटकावणार? की केकेआर तिसऱ्यांदा विजयी ट्रॉफी उचलणार या प्रश्नाचं आज उत्तर मिळेल.

यंदाच्या हंगामात दोन्ही संघाचा आतापर्यंतचा खेळ पाहता चेन्नईने 14 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तर केकेआरने 14 पैकी 7 सामनेच जिंकले आहेत. पण नेटरनरेटच्या जोरावर केकेआरने प्लेऑफमध्ये जागा मिळवली आणि नंतर क्वॉलीफायरच्या सामन्यात गुणतालिकेत नंबर 1 असणाऱ्या दिल्लीचा धक्कादायकरित्या पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे.

कोलकाता विरुद्ध चेन्नई Head To Head

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि चेन्नई हे संघ 25 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारडं कमालीचा जड असून त्यांनी 25 पैकी 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता केवळ 8 वेळाच विजय मिळवू शकला असून एक सामना अनिर्णीत सुटला आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

केकेआर- इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपरकिंग्स- फाफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड, दीपक चाहर.

हे ही वाचा

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्यात केकेआरला एका गोष्टीचा फटका नक्कीच बसणार, दिग्गज गोलंदाज डेल स्टनने व्यक्त केलं मत

(Know Head to head of todays IPL Final match KKR vs CSK match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Kolkata Knight Riders vs Chennai superkings)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI