RCB vs CSK, Head to Head: विराटसेनेशी भिडणार धोनीचे धुरंधर, आतापर्यंतच्या सामन्यात कोणाचं पारडं जड?

भारताचा कर्णधार आणि भारताचा माजी कर्णधार या दोघांमध्ये आज सामना रंगणार आहे. गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील आजची लढत म्हणजे काटेंकी टक्कर असणार हे नक्की!

RCB vs CSK, Head to Head: विराटसेनेशी भिडणार धोनीचे धुरंधर, आतापर्यंतच्या सामन्यात कोणाचं पारडं जड?
आरसीबी विरुद्ध सीएसके
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 4:03 PM

IPL 2021: आयपीएलमध्ये (IPL 2021) धडाकेबाज खेळ दाखवत गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणारे संघ चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) संघ आज एकमेकांशी भिडणार आहेत. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) असून चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS dhoni) आहे. त्यामुळे आजची लढत भारताचा सध्याचा कर्णधार आणि माजी कर्णधार यांच्यात असणार आहे. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये दोघांचे सर्वाधिक चाहते आहेत. त्यामुळे आजची लढत चुरशीची असणार हे नक्की! पण या लढतीच्या आधी दोघांची यंदाच्या आयपीएल मधील आणि याआधीच्या आयपीएलमधील आकडेवारी जाणून घेऊया…

गुणतालिकेचा विचार करता चेन्नईचा संघ आतापर्यंत 8 सामने खेळला असून त्यातील 6 सामने जिंकत 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर आरसीबी 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे.

चेन्नईचे पारडे जड

आतापर्यंत झालेल्या आयपीएल स्पर्धांमध्ये सीएसके आणि आरसीबी 26 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये चेन्नईचे पारडेच जड असून त्यांनी तब्बल 17 वेळा विजय मिळवला आहे. तर आरसीबी 9 वेळाच विजय मिळवू शकली आहे. आज होणारा सामना शारजाहच्या स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता षटकारांची बरसात होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

 रॉयल चँलेजर्स बंगळुरु- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, सचिन बेबी, वनिंजू हसरंगा, कायल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

चेन्नई सुपरकिंग्स –एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

हे ही वाचा

IPL 2021: आधी गोलंदाजांनी जखडलं, मग अय्यर-त्रिपाठीने फोडलं, KKR चा मुंबईवर 7 विकेट्सनी विजय

Eoin Morgan : मुंबईविरुद्ध सोपा विजय, तरीही कोलकाताच्या कर्णधाराला मोठा झटका

MI vs KKR: दिनेश कार्तिकसाठी मुंबईविरुद्धचा सामना ठरला खास, नवा रेकॉर्ड करत महान यष्टीरक्षक धोनीला सोडलं मागे

(Know Head to head of todays match RCB vs CSK match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Royal Challengers Bangalore vs Chennai Superkings)

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.