AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB, Head to Head: आयपीएलमध्ये आज ‘रॉयल’ लढत, विराटसेना भिडणार राजस्थान रॉयल्सशी, प्लेऑफच्या एन्ट्रीसाठी सामना महत्त्वाचा

दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुची लढत आज संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघासोबत असणार आहे.

RR vs RCB, Head to Head: आयपीएलमध्ये आज 'रॉयल' लढत, विराटसेना भिडणार राजस्थान रॉयल्सशी, प्लेऑफच्या एन्ट्रीसाठी सामना महत्त्वाचा
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 4:37 PM
Share

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील (IPL 2021) 43 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या दोन संघामध्ये होणार आहे. हळूहळू आयपीएलच्या प्लेऑफचे चित्र स्पष्ट होत असल्याने आजचा सामनाही प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघाना महत्त्वाचा आहे. यंदा चांगल्या लयीत असलेली विराट सेना आजचा सामना जिंकण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार हे नक्की! तर राजस्थानचं आव्हानही साधं नसणार आहे.

गुणतालिकेचा विचार करता राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु या दोन्ही संघानी 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघांच्या खात्यात 8 गुण आहेत. पण आरसीबीचा रनरेट -0.359 असून राजस्थानचा रनरेट -0.369 आहे. त्यामुळे आरसीबी तिसऱ्या तर राजस्थान सातव्या स्थानावर आहे.

आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स Head To Head

राजस्थान आणि आरसीबी हे दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी आरसीबीने 11 तर राजस्थानने 10 सामने जिंकले आहेत. तसेच 3 सामने अनिर्णीत सुटले आहेत. त्यामुळे दोघांची आतापर्यंतच्या सर्व लढती चुरशीची असल्यामुळे आजचा सामनाही रंगतदार होणार यात शंका नाही.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन(कर्णधार आणि यष्टीरक्षक),  एविन लुईस, यशस्वी जैसवाल, डेविड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, माहिपार लोमरोर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया

रॉयल चँलेजर्स बंगळुरु- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, सचिन बेबी, वनिंजू हसरंगा, कायल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

हे ही वाचा

MI vs PBKS : मुंबईच्या पंजाबवरील विजयानंतर MI चे चाहतेच नाही, तर संपूर्ण भारतीय क्रिकेट फॅन्स खुश, ‘हे’ आहे कारण

महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावा लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

DC vs KKR: दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याला वादाचे गालबोट, सामना सुरु असतानाच मॉर्गनच्या अंगावर आला आश्विन, पाहा VIDEO

(Know Head to head of todays match RR vs RCB match and Know probable playing 11 for Todays IPL Match)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.