AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंड्या बंधूनी मुंबईत ‘या’ ठिकाणी घेतलं 30 कोटींच घर, वाचा घराबद्दलच्या काही खास गोष्टी

भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दीक आणि कृणाल यांनी नुकतच मुंबईत 30 कोटी रुपये किमतीचं घर घेतलं. या आलिशान घरात सर्वप्रकारच्या सोयीसुविधा आहेत.

पंड्या बंधूनी मुंबईत 'या' ठिकाणी घेतलं 30 कोटींच घर, वाचा घराबद्दलच्या काही खास गोष्टी
हार्दीक पंड्या
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 1:53 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्या  (Krunal Pandya) यांनी नुकतंच मुंबईत 30 कोटीचं घर विकत घेतलं. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पंड्या बंधूनी हे घर विकत घेतल्याने सध्या गुजरातमध्ये राहत असलेले पंड्या बंधू मुंबईत स्थायिक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढलेल्या पंड्या बंधूनी स्वत:च्या मेहनतीच्या आणि खेळाच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे. त्यांच्याकडच्या आलिशान गाड्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेकदा दिसत असतात पण आता त्यांनी नवं घर घेतलं असून या घरात अनेक खास गोष्टी आहेत.

मूळात या घराचं ठिकाणही अत्यंत मध्यवर्ती आहे. मुंबईतील पंड्या बंधूचा हा फ्लॅट उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या रुस्तमजी पॅरामाउंट याठिकाणी आहे. इथे अनेक बॉलीवुड अभिनेता-अभिनेत्रींचे फ्लॅट आहेत. दिशा पटानी, टायगर श्रॉफ यासारखे कलाकार याठिकाणी राहतात.

फ्लॅटमध्ये आहेत इतके बेडरुम

पंड्या बंधूनी विकत घेतलेला हा फ्लॅट 3 हजार 838 स्केयर फीटचा आहे. या फ्लॅटमध्ये तब्बल 8 बेडरूम्स आहेत.

जिम, पूल आणि बरचं काही

पंड्या बंधूचा हा फ्लॅट अत्यंत आलिशान असून डीएनएच्या वृत्तानुसार हार्दिक आणि कृणालच्या या घरात सर्व सोयींयुक्त व्यायम शाळा, जिम्नॅशियम आहे. क्रिकेटपटू असल्याने सराव आणि आरोग्य तंदरुस्त ठेवण्यासाठी पंड्या बंधूनी जिमवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. याशिवाय एक स्वतंत्र गेमिंग झोन देखील या फ्लॅटमध्ये आहे. या सर्वासह रिलॅक्स होण्याकरता एक प्रायवेट स्विमिंग पूल आणि प्रायवेट थिएटर देखील या फ्लॅटमध्ये आहे.

इतर बातम्या

IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

(Know special things inside hardik and krunal pandyas mumbais 30 crore house)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.