कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांना संघातून काढलं बाहेर, झालं असं की….
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव यांच्या संघातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक असं का झालं? अशी चर्चा आता क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. त्यामागे विशेष कारण आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर...

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरला युएईत रवाना होणार आहे. यासाठी खेळाडूंची तयारी देखील सुरु झाली आहे. असं असताना चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्याबाबत निर्णय घेणं भाग पडलं आहे. या दोघांना रवाना होण्यापूर्वी संघातून डावलणं भाग होतं. आशिया कप संघातून नाही तर दुलीप ट्रॉफी संघातून डावलण्यात आलं आहे. कारण हे दोन्ही खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळत होते. कुलदीप यादव सेंट्रल झोनकडून, तर अर्शदीप सिंग नॉर्थ झोनकडून खेळत होता. पण आता उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही खेळाडू संघात नसतील. कारण आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात या दोन्ही खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे संघ या स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरला रवाना होणार आहे. तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना 4 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे दोघांना दुलीप ट्रॉफीतून वगळण्यात आलं आहे.
कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग हे दोन्ही खेळाडू दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळले होते. अर्शदीप सिंगने ईस्ट झोनविरुद्धच्या सामन्यात 17 षटकं टाकली आणि 51 धावा देत 1 गडी बाद केला. तर कुलदीप यादवने सेंट्रल झोनसाठी खेळताना नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध 20 षटकं टाकली. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच 55 दावा दिल्या. आता दुलीप ट्रॉफीत उपांत्य फेरीचा सामना नॉर्थ झोन आणि साउथ झोन यांच्यात होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना सेंट्रल झोन आणि वेस्ट झोन यांच्यात होणार आहे.
दुलीप ट्रॉफीत या दोघांची कामगिरी काही खास राहिली नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघात या दोघांना स्थान मिळालं आहे. आशिया कप स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये आहे. त्यात या दोघांची टी20 मध्ये कामगिरी चांगली राहिली आहे. कुलदीप यादव पहिल्यांदा आशिया कप स्पर्धा खेळणार आहे. अर्शदीप सिंग दुसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये टी20 आशिया कप स्पर्धा खेळला होता. त्यात पाच सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या.
