Laal Singh Chaddha: ”लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून सैन्याचा अपमान’, दिग्गज क्रिकेटपटू आमिर खानवर भडकला

Laal Singh Chaddha: आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' (lal singh chaddha) आज रिलीज झाला. हॉलिवूड फिल्म 'फॉरेस्ट गंप'चा हा चित्रपट रिमेक आहे.

Laal Singh Chaddha: ''लाल सिंह चड्ढा' चित्रपटातून सैन्याचा अपमान', दिग्गज क्रिकेटपटू आमिर खानवर भडकला
lal sing chaddhaImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 3:29 PM

मुंबई: आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (lal singh chaddha) आज रिलीज झाला. हॉलिवूड फिल्म ‘फॉरेस्ट गंप’चा हा चित्रपट रिमेक आहे. आमिर खान या चित्रपटात एका शिखाच्या भूमिकेत आहे. मानसिक दृष्टया फिट नसलेल्या व्यक्तीचा रोल आमिरने निभावला आहे. हा चित्रपट ज्यांनी पाहिलाय, ते सुपरहिट म्हणत आहेत. पण त्याचवेळी या चित्रपटाला काही जण विरोधही करत आहेत. इंग्लिश क्रिकेटपटू मॉन्टी पनेसरच (monty panesar) मत आहे की, या चित्रपटातून भारतीय सैन्य आणि शिखांचा अपमान करण्यात आला आहे. पनेसरने टि्वट करुन ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. पनेसरचं हे टि्वट सोशल मीडियावर व्हायरल झालय.

भारतीय सैन्य, सशस्त्र बल आणि शिखांचा अपमान

“फॉरेस्ट गंप’ अमेरिकन सैन्यासाठी योग्य आहे. कारण अमेरिकेने व्हिएतनाम युद्धासाठी कमी आयक्यू असलेल्या पुरुषांची भर्ती केली होती. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाने भारतीय सैन्य, सशस्त्र बल आणि शिखांचा अपमान केला आहे” असं पनेसरने आपल्या टि्वट मध्ये म्हटलय.

सोशल मीडियावर या चित्रपटाच्या विरोधात अभियान

आमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपट थिएटर्स मध्ये प्रदर्शित झाला आहे. अनेक वाद सुरु असताना, हा चित्रपट रिलीज झालाय. लोकांनी हा चांगला चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. काही लोक हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी  करतायत. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या विरोधात अभियानही सुरु आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तम फिरकी गोलंजदाज मॉन्टी पनेरसही आमिरच्या या चित्रपटावर नाराज आहे.

‘फॉरेस्ट गंप’ 67 कोटी डॉलर्सची कमाई

हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ 1994 मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने 67 कोटी डॉलर्सची कमाई केली होती. टॉम हॉक्सचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता बॉक्स ऑफिस वर आमिर खानचा हा चित्रपट किती कमाई करतो, त्याची उत्सुक्ता आहे. कारण आमिर खानचे मागचे काही चित्रपट फ्लॉप ठरले होते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.