ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ क्रिकेटपटूचं बंदुकीचा धाक दाखवून अपहरण अन्…

सिडनीच्या उत्तरेला असणाऱ्या परिसरात एका व्यक्तीने स्टुअर्ट मॅकगिल यांना अडवले. | Stuart McGill Kidnapped

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:32 PM, 5 May 2021
ऑस्ट्रेलियाच्या 'या' क्रिकेटपटूचं बंदुकीचा धाक दाखवून अपहरण अन्...

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू स्टुअर्ट मॅकगिल याचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गेल्या महिन्यात घडली होती. मात्र, अपहरणकर्त्यांनी तासाभरानंतर स्टुअर्ट मॅकगिलला (Stuart McGill )सोडून दिले. (Ex Australian Test Cricketer Stuart McGill Allegedly Kidnapped And Then Released)

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, 14 एप्रिल रोजी घराजवळून स्टुअर्ट मॅकगिल यांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी यासंदर्भात पोलिसांकडून ठोस माहिती देण्यात आली नव्हती. केवळ एका 50 वर्षांच्या व्यक्तीचे अपहरण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रसारमाध्यमांनी या सगळ्याचा माग काढल्यानंतर अपहरण होणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्टुअर्ट मॅकगिल असल्याचे स्पष्ट झाले.

नक्की काय घडलं?

14 एप्रिलला सिडनीच्या उत्तरेला असणाऱ्या परिसरात एका व्यक्तीने स्टुअर्ट मॅकगिल यांना अडवले. त्यानंतर आणखी दोनजण घटनास्थळी आले. या सर्वांनी मिळून स्टुअर्ट मॅकगिलला एका गाडीत कोंबले आणि तिथून निघून गेले. यानंतर स्टुअर्ट मॅकगिल यांना गाडीतून बेलमोर येथे नेण्यात आले. त्यांना मारहाणही करण्यात आली. मात्र, त्यानंतर अपहरणकर्त्यांनी स्टुअर्ट मॅकगिल यांना सोडून दिले. याप्रकरण आता पोलिसांना चार जणांना ताब्यात घेतले आहे.

कोण आहे स्टुअर्ट मॅकगिल?

ऑस्ट्रेलियन संघातून क्रिकेट कारकीर्द गाजवणाऱ्या खेळाडुंमध्ये स्टुअर्ट मॅकगिल यांचा समावेश होतो. 1998 ते 2008 या काळात त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 44 कसोटी सामन्यांमध्ये 208 बळी टिपले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या लेग स्पिनर्सध्ये ते चौथ्या स्थानी आहेत. तर स्थानिक क्रिकेटमधये स्टुअर्ट मॅकगिल यांनी न्यू साऊथ वेल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. न्यू साऊथ वेल्सच्या संघाकडून खेळताना त्यांनी 328 बळी टिपले होते. 2008 साली स्टुअर्ट मॅकगिल यांनी क्रिकेटमधून निवृत्ती पत्कारली.

इतर बातम्या:

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी येऊ देणार की नाही?, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं स्पष्टीकरण

IPL 2021 : आयपीएल स्थगित, कोणकोणते विदेशी खेळाडू भारतात अडकलेत?, वाचा संपूर्ण यादी….

IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतरची सर्वांत मोठी बातमी, पोलिसांकडून 2 जणांना बेड्या, कारण काय?

(Ex Australian Test Cricketer Stuart McGill Allegedly Kidnapped And Then Released)