AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतानं गोल्ड जिंकलं, पण जगात चर्चा ‘या’ पठ्ठ्याची, 23 वर्षांत कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

एकीकडे भारतानं गोल्ड जिंकलं आहे पण जगभरामध्ये याच खेळाडूची चर्चा रंगते आहे. हा क्रिकेटर दक्षिण आफ्रिकेचा असून त्याने नेमकं काय केलं आहे? जाणून घ्या.

भारतानं गोल्ड जिंकलं, पण जगात चर्चा 'या' पठ्ठ्याची, 23 वर्षांत कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं
Cricket South Africa T20 world recordImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 10:50 PM
Share

एकीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारत सुवर्णपदकावर दिमाखात नाव कोरलंय. सध्या देशभरात याच ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आणि सुवर्णपदकाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, क्रिकेट विश्वातील या आनंदाच्या वातावरणातच आणखी एक थक्क करणारी घडामोड समोर आली आहे. टी२० क्रिकेटमध्ये युनिव्हर्स बॉस म्हणून गाजलेल्या ख्रिस गेलचा सर्वाधिक १७५ धावांचा विक्रम मोडणे अशक्य मानले जात होते. पण, दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज लुआंड्रे प्रिटोरियस याने हा महाविक्रम मोडीत काढत संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या देशांतर्गत टी-२० लीगमध्ये टायटन्स या संघाकडून खेळताना प्रिटोरियसने हा अविश्वसनीय धमाका केला. त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढत अवघ्या ७९ चेंडूंचा सामना करताना तब्बल १८८ धावांची वादळी खेळी उभी केली. यासह त्याने टी२० च्या २३ वर्षांच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी खेळी साकारत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय.

या ऐतिहासिक खेळीत प्रिटोरियसच्या बॅटमधून नुसता धावांचा पाऊस पडला. त्याने १५ खणखणीत चौकार आणि १३ गगनभेदी षटकार लगावलेत. त्याचा स्ट्राईक रेट २३७ च्या पुढे होता. त्याने आपले पहिले अर्धशतका २४ चेंडूत पूर्ण केले, पण त्यानंतर त्याने असा काही गिअर बदलला की पुढच्या अवघ्या १६ चेंडूत आपले झंझावाती शतक पूर्ण केले. ५८ चेंडूत दीडशे धावांचा टप्पा ओलांडत त्याने थेट १८८ धावांपर्यंत मजल मारली.

थोडक्यात सांगायचे तर, ख्रिस गेल आणि ॲरॉन फिंच सारख्या मातब्बर दिग्गजांना मागे टाकत प्रिटोरियसने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. एका बाजूला आशियाई स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून मिळवलेले सुवर्णपदक आणि दुसऱ्या बाजूला प्रिटोरियसचा हा अफाट पराक्रम, यामुळे सध्या क्रीडा विश्वात या दोनच मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६च्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदक  जिंकले आहे. जपानमधील निशिन येथे खेळवल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने सलग दुसऱ्यांदा आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचे सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर