रोहित-विराट प्रमाणेच या दिग्गज जोडीने ही घेतली होती वर्ल्डकप विजयानंतर निवृत्ती
T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण १० वर्षापूर्वी अशाच दोन दिग्गज खेळाडूंनी अशाच प्रकारे निवृत्ती जाहीर केली होती. कोण होते ते दिग्गज खेळाडू जाणून घ्या.

भारतीय संघाने इतिहास रचला आहे. २००७ नंतर भारताने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळला. या विजयानंतर भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने सर्वप्रथम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर लगेचच कर्णधार रोहित शर्मानेही निवृत्तीची घोषणा केली. जेतेपद पटकावल्यानंतर या जोडीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. विजयानंतर निवृत्तीचा घेणाऱ्या या जोडीप्रमाणे 10 वर्षाआधी देखील एका जोडीने अशीच निवृत्ती जाहीर केली होती.
भारतीय संघ 10 वर्षांपूर्वी देखील टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होता. पण हा सामान श्रीलंकेने 6 विकेटने जिंकला होता. श्रीलंकेच्या संघाचा हा पहिलाच टी-२० विश्वचषक विजय होता. जेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंकेचा स्टार फलंदाज महेला जयवर्धनेने याने टी-20 आंतरराष्ट्रीयमधून क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारानेही टी-20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली होती.
जयवर्धने याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 55 सामन्यांमध्ये 1493 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. संगकाराने 56 टी-20 सामन्यात 1382 धावा केल्या आहेत. यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. जयवर्धने आणि संगकारा हे दोन्ही महान खेळाडू आहेत. त्याच्या निवृत्तीनंतर श्रीलंकेचा संघ जवळपास कोलमडला होता.
भारतीय संघाने यंदाचा T20 विश्वचषक जिंकला आहे. चॅम्पियन बनल्यानंतर जयवर्धने आणि संगकाराप्रमाणे कोहली आणि रोहितनेही निवृत्ती जाहीर केलीये. दोघांनीही या T20 International मधून निवृत्ती घेतली आहे.
कोहलीची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
एकूण T20 सामने: 125 धावा: 4188 सरासरी: 48.69 स्ट्राइक रेट: 137.04 शतक : 1 अर्धशतक: 38 षटकार: 124 चौकार: 369
रोहितची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
एकूण T20 सामने: 159 धावा: 4231 सरासरी: 32.5 स्ट्राइक रेट: 140.89 शतके: 5 अर्धशतक: 32 षटकार: 205 चौकार: 383
