मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महाआर्यमन यांचा अपघात, झालं असं की…
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र आणि मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशने अध्यक्ष महाआर्यमन सिंधिया यांचा रस्ते अपघात झाला आहे. शिवपुरी दौऱ्यात त्यांना दुखापत झाली. गाडीचा अचानक ब्रेक लावल्याने त्यांच्या छातीला मार लागला आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महाआर्यमन सिंधिया यांचा शिवपुरी भेटीदरम्यान अपघात झाला. महाआर्यमन दोन दिवसांच्या शिवपुरी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कोलारस विधानसभा मतदारसंघातील युवा परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर कॉलेजच्या मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेला त्यांनी भेट दिली. तिथे त्यांचे समर्थक स्वागतासाठी उभे होते. मिडिया रिपोर्टनुसार, महाआर्यमन हे त्यांचं स्वागत स्वीकारण्यासाठी गाडीच्या सनरूफबाहेर येत अभिवादन स्विकारत होते. यावेळी ते अभिवादन स्वीकारताना झुकले होते. तेव्हा चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्यांची छाती गाडीच्या पुढच्या भागावर आदळली आणि त्यांना दुखापत झाली. दुखापतीकडे त्यांनी सुरुवातीला कानाडोळा केला आणि दौरा सुरुच ठेवला. पण संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ शिवपुरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे सिटी स्कॅन केलं गेलं. या दुखापतीमुळे ते बामौरा येथील कार्यक्रमात हजेरी लावू शकले नाहीत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 40 मिनिटांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आराम करत आहेत.
महाआर्यमन सिंधिया यांना मस्क्युलर इंजरी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. ‘तुम्हा सर्वांची चिंता, प्रार्थना आणि आशीर्वादामुळे मनापासून आभार. देवाच्या कृपेने सर्वकाही ठीक आणि व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काही काळ आराम करत आहे. या काळात आपल्याकडून मिळालेलं प्रेम, संवेदना आणि आशीर्वादासाठी मी तुमचा ऋणी आहे.’, असं महाआर्यमन सिंधिया यांनी ट्वीट करून सांगितलं.
आप सभी की चिंता, दुआओं और शुभकामनाओं के लिए दिल से धन्यवाद।
ईश्वर की कृपा से मैं ठीक एवं सकुशल हूँ और डॉक्टरों की सलाह पर कुछ समय आराम कर रहा हूँ।
इस समय मिले आप सभी के स्नेह, संवेदना और आशीर्वाद के लिए मैं हृदय से आभारी हूँ।
— Mahanaaryaman Scindia (@AScindia) January 6, 2026
STORY | Mahanaryaman Scindia hurt as his car stopped
Union Minister Jyotiraditya Scindia’s son Mahanaryaman Scindia on Monday suffered an injury in his chest when the driver of his car suddenly applied the brakes in Shivpuri district, an official said. Mahanaryaman was waving… pic.twitter.com/jthlNWGRas
— Press Trust of India (@PTI_News) January 6, 2026
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “महाआर्यमन यांच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्यांना औषध देण्यात आले आहे आणि बेल्ट घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांची दुसरी वैद्यकीय तपासणी केली जाईल.”
