AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून रिटायर होणार? मैदानात पहिल्यांदाच घडलं असं काही…

महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2024 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 20 वर्षाहून अधिक काल क्रिकेटचं मैदान गाजवत आहे. सध्या आयपीएलमध्ये धोनी खेळत आहे. असं असताना इतक्या वर्षानंतर मैदानात एक मोठी घटना घडली. यामुळे धोनी रिटायर होणार असल्याच्या बातम्यांना बळ मिळालं आहे.

महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून रिटायर होणार? मैदानात पहिल्यांदाच घडलं असं काही...
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 05, 2025 | 5:44 PM
Share

15 ऑगस्ट 2020 सारखी 5 एप्रिल 2025 ही तारीख भारतीय क्रीडाप्रेमींच्या स्मरणात कायमस्वरूपी राहिल, अशी चर्चा क्रीडाविश्वात रंगली आहे. कारण 15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांना महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर धोनी फक्त आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसत आहे. असं असताना 5 एप्रिल 2025 रोजी धोनी निवृत्ती घेईल? अशी चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. आतापर्यंत धोनीच्या 20 वर्षांच्या कारकि‍र्दीत पहिल्यांदाच धोनीचे आई वडील सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी मागच्या पाच वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. प्रत्येक आयपीएलवेळी रिटायर होणार या चर्चा रंगतात. पण धोनी पुन्हा मैदानात उतरताना दिसतो. आयपीएल 2023 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं होतं. तेव्हा धोनी रिटायर होईल या चर्चांना उधाण आलं होतं. पण तसं काही झालं नाही. धोनी त्यानंतर अजून जोमाने खेळताना दिसला. पण या दरम्यान धोनीचे आई वडील एकदाही सामना पाहण्यासाठी आले नव्हते.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात अचानक धोनीचे आई वडील सामना पाहण्यासाठी आले. या बातमीने चाहत्यांना मनात शंकांचं काहूर माजलं आहे. धोनी रिटायर तर होणार नाही ना? दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेपॉक मेदानात सामना सुरु आहे. या सामन्यापूर्वी जियो हॉटस्टारचा अँकरने हा खुलासा केला. धोनी आई वडील सामना पाहण्यासाठी आल्याचं सांगितलं. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. काही वेळानंतर त्यांना टीव्ही स्क्रिनवर धोनीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली. मनात शंका आहे की, धोनी शेवटचा सामना तर खेळत नाही ना?

धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आक्रमक फलंदाजीने सर्वांच्या गळ्यातलं ताईत बनला. 2007 मध्ये कर्णधारपद हाती घेतल्यानंतर टी20 वर्ल्डकप जिंकून दिला. त्यानंतर धोनीने मागे वळून पाहिलं नाही. पण इतकी सारी यशाची शिखरं गाठत असताना धोनीला मैदानात पाहण्यासाठी कधीच त्याचा आई वडील आले नाहीत. पण आता मैदानात सामना पाहण्यासाठी आल्याने चाहत्यांचं शंकेने मन खात आहे.

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....