AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात सुथार आणि पंतचा बालिशपणा, केएल राहुलने अशी चूक सुधारली

भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यात तीन दिवसीय कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर श्रीलंकेने पकड मिळवली आहे. त्यात भारतीय खेळाडूंचा एक बालिशपणा चर्चेचा विषय ठरला आहे. सुथार आणि पंतच्या कृतीमुळे चाहते आवाक् झाले आहेत.

Video: श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात सुथार आणि पंतचा बालिशपणा, केएल राहुलने अशी चूक सुधारली
Video: श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात सुथार आणि पंतचा बालिशपणा, केएल राहुलने अशी चूक सुधारलीImage Credit source: PTI
| Updated on: Aug 07, 2026 | 2:42 PM
Share

भारत आणि श्रीलंका इलेव्हन सराव सामन्यात आमनेसामने आले आहेत. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाची खऱ्या अर्थाने चाचणी परीक्षा आहे. या सामन्यात श्रीलंका इलेव्हनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात निशान मधुष्का आणि रविंदू रसंथा यांनी श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली. खरं तर पहिल्या विकेटसाठी टीम इंडियाला खूपच घाम गाळवा लागला. एक त विकेट मिळत नव्हती. त्यामुळे गोलंदाज विकेटसाठी धडपड करत होते. त्यामुळे पहिल्या डावात श्रीलंका भारी पडली अशाच भावना क्रीडाप्रेमींच्या मनात होत्या. पहिली विकेट श्रीलंकेच्या 110 धावा असताना मिळाली. ही विकेट पण बालिशपणामुळे गेल्यातच जमा होती. पण केएल राहुलने ऐन वेळी चूक सुधारली आणि भारताच्या खात्यात पहिली विकेट आली. खरं तर मानव सुथार आणि ऋषभ पंतने गल्ली क्रिकेटला लाजवेल असा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यात केला.

ऋषभ पंत-मानव सुथार यांनी काय चूक केली?

कर्णधार केएल राहुलने संघाचं 21वं षटक मानव सुथारच्या हाती सोपवलं. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर निशान मदुष्का स्ट्राईकला होता आणि 66 धावांवर खेळत होता. त्याने या चेंडूवर यशस्वी जयस्वालच्या दिशेने फटका मारला आणि धावत गेला. पण नॉन स्ट्राईकला असलेला रविंदू रसंथा हा चेंडूकडे पाहात होता. त्यामुळे धावलाच नही. यशस्वी जयस्वालने चेंडू मानव सुथारकडे फेकला होता. त्यानंतर त्याने तात्काळ स्ट्राईक विकेट मिळेल या हेतूने चेंडू फेकला. पण हा थ्रो इतका वाईट होता की ऋषभ पंतच्या डोक्यावरून गेला. चेंडू डोक्यावरून गेल्याचं पाहून ऋषभ पंतने ग्लव्ह्ज लावून बेल्स पाडली.

ऋषभ पंतने सोडलेला चेंडू केएल राहुलने पकडला आणि धावत यष्टीकडे गेला. बेल्स पडल्याने त्याने चेंडूसह स्टम्प उचलली. बेल्स पडल्यानंतर स्टम्प उचलणं भाग असता अन्यथा बाद दिलं जात नाही. केएल राहुलच्या समयसूचकतेमुळे भारताला पहिली विकेट मिळाली. पण ऋषभ पंत आणि मानव सुथारच्या कृतीमुळे संताप व्यक्त होते. दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी सुमार गोलंदाजी केली. त्यामुळे विकेटसाठी खूपच धडपड करावी लागत आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात 240 पार धावा केल्या असून यात आणखी भर पडत आहे. प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा, गुरनूर ब्रार यांनी गोलंदाजीत निराशा केली. कुलदीप यादवही खाही खास करू शकला नाही.

Follow Us
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन