AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashid Khan: Mumbai Indians च्या राशिद खानला 6,4,6,6,0,6 दक्षिण आफ्रिकेत बेकार धुतलं, बॉलिंग बिघडवली VIDEO

Rashid Khan: पहिलाच सीजन सुरु आहे, मग 267 दिवसांपूर्वीचा हिशोब चुकता केला, असं तुम्ही कसं म्हणू शकता? SA20 लीगमद्ये मार्को जॅनसेनने बदला घेतला. IPL 2022 मध्ये या सगळ्याची सुरुवात झाली होती.

Rashid Khan: Mumbai Indians च्या राशिद खानला 6,4,6,6,0,6 दक्षिण आफ्रिकेत बेकार धुतलं, बॉलिंग बिघडवली VIDEO
Rashid khan
| Updated on: Jan 19, 2023 | 9:54 AM
Share

डरबन: तू एक मारशील, तर मी तुला दोन मारीन, असं वाक्य काहीवेळा आपल्या कानावर ऐकू येतं. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये असच काहीस पहायला मिळालं. या लीगमध्ये 267 दिवसापूर्वीचा हिशोब चुकता झाला. तुम्ही म्हणाल, आताच SA20 लीग सुरु झालीय. पहिलाच सीजन सुरु आहे, मग 267 दिवसांपूर्वीचा हिशोब चुकता केला, असं तुम्ही कसं म्हणू शकता? SA20 लीगमद्ये मार्को जॅनसेनने बदला घेतला. IPL 2022 मध्ये या सगळ्याची सुरुवात झाली होती. राशिद खान विरोधात हिशोब चुकता केल्यानंतर मार्को जॅनसेनच्या मनाला आता कुठे शांती मिळाली असेल.

जॅनसेन विजयाचा नायक

SA20 मध्ये 18 जानेवारी मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि सनरायजर्स ईस्टर्न कॅपमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये बदल्याचा हा खेळ पहायला मिळाला. सनरायजर्स ईस्टर्न कॅपने ही मॅच जिंकली. या मॅचमध्ये मार्को जॅनसेनने हिशोब चुकता केला, त्याची सर्वात जास्त चर्चा आहे. मार्को जॅनसेन सनरायजर्सच्या विजयाचा नायक ठरला.

27 चेंडूत ठोकल्या 66 रन्स

मुंबई इंडियन्स केपटाऊनने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने 6 विकेट गमावून 171 धावा केल्या. सनरायजर्स ईस्टर्न कॅपसमोर विजयासाठी 172 धावांच टार्गेट होतं. सनरायजर्सने 3 चेंडू राखून हे लक्ष्य गाठलं. मार्को जॅनसेनच्या वादळी खेळीमुळे सनरायजर्सला हे लक्ष्य पार करता आलं. मुंबई इंडियन्स केपटाऊनचा बॉलर राशिद खानवर त्याने हल्लाबोल केला.

मॉर्को जॅनसेनने 27 चेंडूत फक्त 66 धावाच फटकावल्या नाहीत, तर त्याने 3 चौकार आणि 7 षटकार मारले. 244.44 च्या स्ट्राइक रेटने त्याने बॅटिंग केली.

राशिद खानला धुतलं

मार्को जॅनसेनने 7 पैकी 4 सिक्स फक्त एका ओव्हरमध्ये मारले. 3 पैकी एक चौकारही याच ओव्हरमध्ये मारला. 66 पैकी 28 धावा याच ओव्हरमध्ये आल्या. महत्त्वाच म्हणजे राशिद खानच्या ओव्हरमध्ये या सगळ्या धावा आल्या. सनरायजर्स ईस्टर्न कॅपच्या इनिंगची ती 16 वी ओव्हर होती. 267 दिवसानंतर घेतला बदला

27 एप्रिल 2022 रोजी आयपीएल सामना झाला. राशिद खान गुजरात टायटन्सकडून खेळत होता. राशिद खानने या मॅचमध्ये SRH विरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली होती. याच सामन्यात मार्को जॅनसेनच्या एका ओव्हरमध्ये राशिद खानने 25 धावा कुटल्या होत्या. गुजरात टायटन्सच्या इनिंगमधील ती शेवटची 20 वी ओव्हर होती. राशिदने या ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि एक चौकार मारला होता.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच