AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : आणखी 2, 3 की 4? रोहित किती सामन्यांतून बाहेर? हेड कोचने सांगितलं

Mahela Jayawardene On Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्सची 19 व्या मोसमात आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यात रोहित शर्मा याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्याने पलटणच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Rohit Sharma : आणखी 2, 3 की 4? रोहित किती सामन्यांतून बाहेर? हेड कोचने सांगितलं
Rohit Sharma Mumbai Indians IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 17, 2026 | 9:11 PM
Share

चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे. धोनीच्या एन्ट्रीची घोषणा येत्या काही दिवसांत होणं अपेक्षित आहे. धोनीला दुखापतीमुळे आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना खेळता आलेला नाही. त्यामुळे चाहत्यांना धोनी कधी परतणार? याची प्रतिक्षा होती. मात्र चाहत्यांची धोनीबाबतची ही प्रतिक्षा लवकरच संपेल, असं चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला दुखापतीमुळे एका सामन्याला मुकावं लागलंय. त्यामुळे रोहितला आणखी किती सामन्यांतून बाहेर रहावं लागेल? असा प्रश्न या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. रोहितच्या दुखापतीबाबत मुंबईचे हेड कोच महेला जयवर्धने यांनी माहिती दिलीय.

रोहित शर्मा याला काय झालं?

रोहितला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यादरम्यान बॅटिंग करताना दुखापत झाली होती. रोहितला या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं होतं. रोहितला या दुखापतीमुळे गुरुवारी 16 एप्रिलला पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यातून बाहेर रहावं लागलं होतं. हार्दिकने पंजाब विरुद्ध टॉसनंतर रोहितला आणखी काही सामन्यांना मुकावं लागू शकतं, असं सांगितलं होतं. आता हेड कोचने रोहितच्या दुखापतीबाबत ताजी अपडेट दिली आहे.

“रोहितने धावायला सुरुवात केली आहे. रोहितला कसं वाटतंय याकडे आम्ही दररोज लक्ष देत आहोत. रोहितला त्याला कसं वाटतंय हे इतरांपेक्षा जास्त माहितीय. त्यामुळे रोहितची दुखापत ही गंभीर बाब नाही. तसेच आम्हाला त्याच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव टाकायचा नाहीय, कारण ही या पर्वाची सुरुवात आहे”, असं जयवर्धनने सांगितलं.

रोहित केव्हापर्यंत कमबॅक करणार?

मुंबईने या मोसमात आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. रोहितने त्यापैकी 4 सामने खेळले आहेत. रोहितने कोलकाता विरुद्ध घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये 78 रन्सची चाबूक खेळी करुन जबरदस्त सुरुवात केली होती. मात्र रोहित त्यानंतर सातत्य कायम ठेवण्यात अपयशी ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित 23 एप्रिलला होणाऱ्या सामन्यातून कमबॅक करु शकतो. मुंबईसमोर 23 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता रोहित सीएसके विरुद्ध कमबॅक करणार की चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...