‘ईशान’दार! हेलिकॉप्टर शॉटसह Ishan Kishanनं दाखवून दिलं, का त्याला सर्वाधिक बोली लागली!

'ईशान'दार! हेलिकॉप्टर शॉटसह Ishan Kishanनं दाखवून दिलं, का त्याला सर्वाधिक बोली लागली!
इशान किशन
Image Credit source: PTI

Ishan Kishan : ईशान किशनची बॅट पहिल्याच सामन्यात तळपली. अवघ्या 48 चेंडूमध्ये ईशान किशननं 81 धावा कुटल्या आहेत. अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या ईशान किशननं खास हेलिकॉप्टर शॉटही लगावला.

सिद्धेश सावंत

|

Mar 27, 2022 | 5:32 PM

मुंबई : आयपीएल 2022च्या (IPL 2022) सर्वात महागड्या खेळाडूनं आपल्यासाठी मोजण्यात आलेली रक्कम त्याच तोडीची आहे हे पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं. ईशान किशनवर (Ishan Kishan) आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक बोली लागली होती. मात्र ईशानला सर्वात जास्त रक्कम मोजत मुंबई इंडियन्सने रिटेन केलं होतं. मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) घेतलेला निर्णय अगदी योग्य असल्याचं ईशानचं आपल्या आयपीएल 2022च्या पहिल्या सामन्यात सिद्ध करुन दाखवलं आहे. अवघ्या 35 चेंडूत ईशान किशनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. रोहित शर्मासोबत ओपनिंगसाठी उतरलेल्या ईशानच्या खेळीनं मुंबईला एका मजबूत स्थितीतही आणून ठेवलंय. मुंबई इंडियन्से ईशानसाठी आयपीएल ऑक्शनवेळी तब्बल 15 कोटीपेक्षा जास्त रक्कम मोजली होती.

ईशान किशनचे दणदणीत आकडे!

  1. किती रन केले? 81
  2. किती बॉल्समध्ये केले? 48
  3. किती फोर? 11
  4. किती सिक्स? 2
  5. स्ट्राईक रेट? 168.75

ईशान किशनची बॅट पहिल्याच सामन्यात तळपली. अवघ्या 48 चेंडूमध्ये ईशान किशननं 81 धावा कुटल्या आहेत. अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या ईशान किशननं खास हेलिकॉप्टर शॉटही लगावला. या सामन्यात ईशानच्या खेळीमुळे मुंबईनं 177 धावा केल्या. पाच विकेट गमावत ईशान किशननं शानदार फलंदाजी केली आहे. दरम्यान, या मॅचमध्ये एकट्या कुलदीप यादवनं तीन विकेट्स घेतल्यात.

रोहित शर्मा आणि ईशान किशनमध्ये 67 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली. त्यानंतर रोहित शर्मा जरी आऊट झाला असला, तरिही ईशान किशननं आपली धुवाधार बॅटिंग सुरुच ठेवली होती. अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सनी 18 धावा कुटल्या होत्या. ओपिनिंगला आलेल्या ईशाननं नॉट आऊट राहत शानदार 81 धावाची नाबाद खेळी केली. ज्यामुळे मुंबई 175 पेक्षा जास्त धावसंख्या उभी करु शकला.

इतर बातम्या :

भावा जिंकलस! इशानच्या भावानं त्याच्यासाठी केलेला त्याग हा इशानला लावलेल्या बोलीपेक्षा मोठाय

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध इशान किशन चांगला खेळला, पण… सुनील गावस्करांनी दाखवून दिला मोठा फरक

IND vs SL, 2nd T20I, LIVE Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें