AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG IPL 2023 Eliminator : सगळ्यांना नडणारा गौतम गंभीर मुंबई इंडियन्सच्या फक्त एका खेळाडूला घाबरतो

MI vs LSG IPL 2023 Eliminator : स्वत: गौतम गंभीरने हे मान्य केलय, कोण आहे तो मुंबईचा प्लेयर?. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, तो खेळाडू कोण? ज्याला गौतम गंभीर इतका घाबरतो.

MI vs LSG IPL 2023 Eliminator : सगळ्यांना नडणारा गौतम गंभीर मुंबई इंडियन्सच्या फक्त एका खेळाडूला घाबरतो
LSG Mentor Gautam Gambhir IPL 2023Image Credit source: PTI
| Updated on: May 24, 2023 | 10:44 AM
Share

चेन्नई : IPL 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सपेक्षा गौतम गंभीरची जास्त चर्चा झाली. गौतम गंभीर फक्त नावाला LSG चा मेंटॉर आहे. पण त्याचं काम एका कोचसारखं वाटतं. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत झालेला त्याचा वाद बराच गाजला. LSG चा मेंटॉर असलेल्या गंभीरला वाद घालण्यासाठी फक्त एक कारण पुरेस ठरतं. सर्वांशी वाद घालणारा गंभीर एका खेळाडूला मात्र घाबरतो.

तुमच्या मनात प्रश्न आला असेल, तो खेळाडू कोण? ज्याला गौतम गंभीर इतका घाबरतो. त्या खेळाडूच नाव आहे रोहित शर्मा. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहितला गौतम गंभीर घाबरतो. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन सर्वात जास्त धोकादायक असल्याच गौतम गंभीर म्हणतो. त्याने एका मुलाखतीत हे सांगितलं होतं.

गौतम गंभीर त्यावेळी रोहितबद्दल काय म्हणाला?

गौतम गंभीरने त्या मुलाखतीत रोहित शर्माला मॉर्डन क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज म्हटलं होतं. रोहित खतरनाक आणि सर्वश्रेष्ठ आहे, हे मान्य करण्यात मला काही अडचण नाही, असं गंभीर त्यावेळी म्हणाला होता. टीमच्या टॉप ऑर्डरमध्ये रोहितसारखा बॅट्समन असेल, तर तुम्ही विजयाची अपेक्षा करु शकता असं गंभीर म्हणाला होता.

आता वास्तव काय?

गंभीर रोहितबद्दल जे बोललेला, त्यात काही चुकीच नाहीय, ते खरं आहे. IPL 2023 च्या सीजनमध्ये मात्र रोहितला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये जरुर आहे, पण त्यात रोहितच योगदान फार नाहीय.

LSG लाच पहिला फटका बसेल

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे बाजी केव्हाही पलटू शकते. जो रोहित ग्रुप स्टेजमध्ये फ्लॉप ठरलाय, कोण सांगू शकतं, प्लेऑफमध्ये तो विजयाचा हिरो ठरेल. कारण रोहित शर्मामध्ये ती क्षमता आहे. असं झाल्यास गौतम गंभीरचीच टीम लखनऊ सुपर जायंट्सला पहिला फटका बसेल. फक्त बॅटनेच नाही, निर्णयाने बाजी पलटण्याची क्षमता

फक्त बॅटनेच नाही, कॅप्टन रोहित शर्मा आपल्या निर्णयाने सुद्धा मॅचची दिशा पलटू शकतो. गौतम गंभीर हे अनेकदा म्हणालाय, रोहित शर्मा बेस्ट कॅप्टन आहे. म्हणजे LSG च्या मेंटॉरला रोहित शर्माची ताकत काय आहे? ते चांगलं माहितीय, त्यामुळेच गंभीरला त्याची भिती वाटते.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.