AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs MI Dream 11 Prediction | लखनऊ विरुद्ध मुंबई आमनेसामने, ड्रीम 11 मध्ये या खेळाडूंना घ्याच

आयपीएल 2023 एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. या टीममूधन तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये कोणत्या 11 जणांना घ्यायचं ते जाणून घ्या.

LSG vs MI Dream 11 Prediction | लखनऊ विरुद्ध मुंबई आमनेसामने, ड्रीम 11 मध्ये या खेळाडूंना घ्याच
| Updated on: May 24, 2023 | 3:01 AM
Share

तामिळनाडू | आयपीएल प्लेऑफ क्वालिफाय 1 मध्ये चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्स संघावर विजय मिळवला. चेन्नई या विजयासह अंतिम फेरीत पोहचली. त्यानंतर आता एलिमनेटर मॅच ही बुधवारी 24 मे रोजी पार पडणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजता टॉस होईल. या सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन कशी असावी, ड्रीम इलेव्हनमध्ये कॅप्टन कोणाला करायचा पिचनुसार बॉलर कोण घ्यायचे हे सर्व आपण माहित करुन घेऊयात.

एमए चिदंबरम पीच रिपोर्ट

एमए चिदंबरम स्टेडियममध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याकडे टीमचा कळ असतो. कारण ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आधी टॉस जिंकून प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंगसाठी भाग पाडायचा प्रयत्न हा टॉस जिंकणाऱ्या टीमचा असतो.

हेड टु हेड आकडेवारी

लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यातील हेड टु हेड आकडेवारी ही पलटणसाठी फार चिंताजनक आहे. लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यात एकूण या 16 व्या मोसमात एकदा आणि त्याआधी 2022 मध्ये दोनवेळा आमनासामना झाला आहे. या एकूण 3 सामन्यात लखनऊने मुंबईला लोळवलंय. स्ट्राँग बॅटिंग लाईनअप असणाऱ्या मुंबई इंडियन्सची लखनऊ विरुद्ध मात्र बॅटली लो होते. मुंबईला अजूनतरी लखनऊवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबईसमोर लखनऊचं आव्हान आहे.

दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन

लखनऊ सुपर जायंट्स | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, रवि बिश्नोई आणि मोहसिन खान.

मुंबई इंडियन्स | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मधवाल.

ड्रीम इलेव्हन टीम

कॅप्टन – ईशान किशन

उप-कर्णधार – मार्कस स्टोयनिस.

विकेटकीपर – क्विंटन डी कॉक.

बॅट्समन – सूर्यकुमार यादव आणि निकोलस पूरन.

ऑलराउंडर – कॅमरुन ग्रीन आणि क्रुणाल पांड्या.

बॉलर– रवि बिश्नोई, पीयूष चावला, मोहसिन खान आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....