AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs PBKS IPL 2022: jasprit Bumrah च्या भन्नाट यॉर्करसमोर लिव्हिंगस्टोनची बोलती बंद, सरळ पॅव्हेलियनमध्ये पहा VIDEO

MI vs PBKS IPL 2022: जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. ते त्याने सिद्ध केलं आहे. मायदेश असो किंवा परदेश जसप्रीत बुमराह नेहमीच गरज असताना, संघाला विकेट मिळवून देतो.

MI vs PBKS IPL 2022: jasprit Bumrah च्या भन्नाट यॉर्करसमोर लिव्हिंगस्टोनची बोलती बंद, सरळ पॅव्हेलियनमध्ये पहा VIDEO
लियाम लिव्हिंगस्टोन जसप्रीत बुमराहच्या यॉर्करवर आऊटImage Credit source: BCCI
| Updated on: Apr 13, 2022 | 9:45 PM
Share

मुंबई: जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. ते त्याने सिद्ध केलं आहे. मायदेश असो किंवा परदेश जसप्रीत बुमराह नेहमीच गरज असताना, संघाला विकेट मिळवून देतो. जसप्रीत बुमराहचा आयपीएलमधला पहिला विकेट होता (Virat kohli) विराट कोहली. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना त्याने विराट कोहलीला बाद केलं होतं. जसप्रीत बुमराह सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग राहिला आहे. आज मुंबई इंडियन्सच संघाचा तो आधारस्तंभ आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला मोठी रक्कम मोजून रिटेन केलं होतं. कुठल्याही खेळपट्टीवर टिच्चून गोलंदाजी करण्याची आणि विकेट मिळवून देण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळेच जसप्रीत बुमराहला भरवशाचं खेळाडू म्हटलं जातं. मुंबई इंडियन्सप्रमाणे बुमराह भारतीय संघाचाही आज अविभाज्य भाग आहे. आज अनेक मॅचेसमध्ये तो उपकर्णधार असतो. भविष्यात कॅप्टनशिपच्या दृष्टीनेही त्याच्याकडे पाहिलं जात आहे.

आज भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन

यंदाचा आयपीएलचा सीजन सुरु झाल्यापासून जसप्रीत बुमराह पूर्ण लयीमध्ये दिसलेला नाही. काही सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. पण काही सामन्यांमध्ये त्याची दिशा भरकटलेली दिसली. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं.

त्याने घेतलेली विकेट लाजबाव

बुमराहने आज चार षटकात 28 धावा देत एक विकेट घेतला. बुमराहला भले आज एकच विकेट मिळाला असेल, पण त्याने घेतलेली विकेट लाजबाव होती. त्याने लियाम लिविंगस्टोनचा मोठा अडसर दूर केला. लियाम लिविंगस्टोन सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. मागच्या दोन सामन्यात त्याने प्रतिस्पर्धी संघाना आपल्या बॅटचा तडाखा दाखवला होता.

बुमराहसमोर काय करणार?

हाच लिविंग्स्टोन आज जसप्रीत बुमराहच्या भन्नाट यॉर्करसमोर निरुत्तर झाला. स्फोटक फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा लिविंगस्टोन बुमराहच्या भन्नाट यॉर्करवर क्लीन बोल्ड झाला. 15 व्या षटकात विकेट मिळवण्यासाठी रोहितने बुमराहकडे चेंडू सोपवला. त्याने सुद्धा कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.