IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, मॅचविनर बॉलरचा पत्ता कट, Playing 11 मध्ये कोण?
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Toss and Playing 11 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील चौथा सामना आहे. आरसीबी यजमान मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये बॅटिंग करणार आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 2012 नंतर मोहिमेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. मुंबईने वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर मुंबई विजयी ट्रॅकवरुन घसरली. मुंबईला सलग 2 पराभवांचा सामना करावा लागला. मुंबईला दिल्ली कॅपिट्ल्स आणि राजस्थान रॉयल्सने पराभूत केलं. आता मुंबई 19 व्या पर्वातील आपल्या चौथ्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. आरसीबीचाही हा चौथा सामना आहे.
मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामना पलटणचा होम ग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने आरसीबी विरुद्ध चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात आता आरसीबी 20 ओव्हरमध्ये किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल
मुंबई आणि बंगळुरु दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. आरसीबीच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये जेकब डफी याचं संघात कमबॅक झालं आहे. त्यामुळे जोश हेझलवूड या मॅचविनर आणि अनुभवी गोलंदाजाला बाहेर व्हावं लागलं आहे. तर मुंबई आरसीबी विरूद्धच्या सामन्यात 2 बदलांसह उतरली आहे. मुंबईने अल्लाह गजनफर आणि दीपक चाहर या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून आऊट केलं आहे. तर या दोघांच्या जागी मयंक मार्कंडे आणि मिचेल सँटनर या दोघांचा समावेश केला आहे.
पॉइंट्स टेबलमधील दोन्ही संघांची स्थिती
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये गतविजेता आरसीबी टीम तिसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आरसीबीच्या खात्यात 4 गुण आहेत. तर मुंबईने 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. मुंबई एकमेव विजय आणि 2 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
लाईव्ह स्कोअर
आरसीबी प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), टीम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी आणि सुयश शर्मा.
मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 शिलेदार : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे आणि जसप्रीत बुमराह.