MI vs SRH : रोहित शर्माचा वानखेडे स्टेडियममध्ये कीर्तीमान, अशी कामगिरी करणारा पहिलाच
Rohit Sharma Wankhde Stadium : रोहित शर्मा याने सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 26 धावांची खेळी केली. रोहितने या खेळीत 3 षटकार लगावले. रोहितने यासह वानखेडे स्टेडियममध्ये इतिहास घडवला.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात गुरुवारी 17 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. मुंबईने घरच्या मैदानात सनरायजर्स हैदराबादवर 4 विके्टसने मात करत या मोसमातील तिसरा आणि वानखेडे स्टेडियममधील दुसरा विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या रोहित शर्मा याने 16 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. इमपॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या रोहितने या खेळीत 3 सिक्स लगावले. रोहितने यासह मोठा कारनामा केला. रोहितने वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेत 100 सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला.
रोहितचं वानखेडेत सिक्सचं ‘शतक’
रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेत एकाच मैदानात 100 किंवा त्यापेक्षा अधिक सिक्स लगावणारा चौथा फलंदाज ठरला. रोहितआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या विराट कोहली याने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 130 षटकार लगावले आहेत. तसेच ख्रिस गेल याने याच मैदानात 127 तर एबी डी व्हीलियर्सने 118 षटकार खेचले आहेत.
वानखेडे स्टेडियममध्ये कुणाच्या नावावर किती सिक्स?
ताज्या आकडेवारीनुसार, आयपीएल स्पर्धेत रोहित शर्मा याने आतापर्यंत एकूण 102 सिक्स लगावले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी मुंबईचा माजी विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड 85 षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. तिसर्या स्थानी सूर्यकुमार यादव आहे. सूर्याने वानखेडेत 48 सिक्स लगावले आहेत. अंबाती रायुडू 43 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर जोस बटलर याने वानखेडेत 41 सिक्स लगावले आहेत.
रोहितच्या 18 व्या मोसमात फक्त 82 धावा
दरम्यान रोहितला 18 व्या मोसमात आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही. रोहित या मोसमात आतापर्यंत बहुतांश वेळा इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळला आहे. रोहितने या मोसमात आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. रोहितला या 6 सामन्यांत फक्त 82 धावाच करता आल्या.
वानखेडेचा राजा रोहित शर्मा
1️⃣0️⃣0️⃣ reasons why Wankhede loves Rohit Sharma 💙
How many more will he add tonight to his tally?#TATAIPL | #MIvSRH | @ImRo45 pic.twitter.com/9HinccGmkW
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
सामन्यात काय झालं?
दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादला मुंबईच्या गोलंदाजासमोर 162 धावाच करता आल्या. मुंबईच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करणं जमलं नाही. प्रत्युत्तरात मुंबईने हे आव्हान 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. मुंबईने अशापक्रारे या हंगामातील एकूण तिसरा विजय मिळवला.
