तीन भारतीय क्रिकेटपटू अटकेत, मॅच फिक्सिंगप्रकरणी दिग्गज फलंदाजाकडून गुन्हा कबूल, क्रिकेट जगतात भूकंप

हा क्रिकेट जगताचा एक काळा अध्याय आहे ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं होतं. ज्यात स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तीन भारतीय क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली होती.

तीन भारतीय क्रिकेटपटू अटकेत, मॅच फिक्सिंगप्रकरणी दिग्गज फलंदाजाकडून गुन्हा कबूल, क्रिकेट जगतात भूकंप
Bangladesh Cricket
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 4:09 PM

मुंबई : हा क्रिकेट जगताचा एक काळा अध्याय आहे ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं होतं. ज्यात स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तीन भारतीय क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक खेळाडू असा होता ज्याने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघासह दोन विश्वचषक जिंकले होते. त्यातील एक दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये खेळवण्यात आलेला टी – 20 विश्वचषक आणि दुसरा 2011 साली भारतात खेळवण्यात आलेला एकदिवसीय वर्ल्ड कप. या दोन्ही स्पर्धांमध्ये तो खेळाडू भारतीय संघाचा शिलेदार होता. त्या खेळाडूचं नाव आहे एस. श्रीसंत, तर अजीत चंदीला आणि अंकित चव्‍हाण अशी उर्वरित दोन खेळाडूंची नावं आहेत. (Mohammad Ashraful admits about match fixing and spot fixing in bangladesh premier league in 2013)

2013 मध्ये घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण क्रिकेट जग हादरलं होतं. बांगलादेशी क्रिकेटमध्ये मोठा भूकंप आला होता. यावेळी एका दिग्गज फलंदाजानेही क्रिकेट खेळाला गालबोट लावलं होतं. ही घटना स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) आणि मॅच फिक्सिंगशीही (Match Fixing) संबंधित होती. बांगलादेशी क्रिकेटच्या इतिहासातील या काळ्या दिवसाची आज आठवण काढण्यामागे कारण आहे. आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (4 जून) ही घटना समोर आली होती. या प्रकरणात दोषी असलेल्या फलंदाजाने याच दिवशी आपला गुन्हा कबूल केला होता.

खरं तर तीन भारतीय क्रिकेटपटूंच्या अटकेनंतर स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात बांगलादेशचा फलंदाज मोहम्मद अशरफुल (Mohammad Ashraful) याचेही नाव समोर आले. त्यानंतर 4 जून 2013 ला बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये अशरफुलने स्पॉट फिक्सिंग आणि आणि मॅच फिक्सिंग प्रकरणात आपलाही सहभाग असल्याचे कबूल केले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा युनिटचा अहवाल येईपर्यंत मोहम्मद अशरफुल याच्यावर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळण्यास बंदी घातली. या प्रकरणात, बांगलादेशी फलंदाजावर आठ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. नंतर त्याची शिक्षा कमी करून पाच वर्षे करण्यात आली.

बांगलादेशच्या 61 कसोटी आणि 177 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधीत्व

मोहम्‍मद अशरफुल हा बांगलादेशी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जायचा. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने 61 कसोटी, 23 टी-20 आणि 177 एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 61 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 24 च्या सरासरीने 2737 धावा जमवल्या होत्या. त्यात 6 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. 190 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 177 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 22.23 सरासरीने आणि 3 शतकं तसेच 20 अर्धशतकांच्या मदतीने 3468 धावा जमवल्या आहेत. तसेच 23 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 19.56 च्या सरासरीने आणि 2 अर्धशतकांच्या 450 धावा जमवल्या आहेत. गोलंदाजीतही त्याने बरी कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर कसोटीत 21, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18 आणि टी-20 मध्ये 8 बळी आहेत.

इतर बातम्या

रोहित शर्मा की विराट कोहली, टी-20 बेस्ट बॅट्समन कोण? गावस्करांनी सांगितलं तिसरंच नाव!

इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूने म्हटलं, ‘मला झोप येत नाही!’

तो आला, त्याने इंग्लंडला झोडलं, पदार्पणात लॉर्ड्सवर षटकाराने दुहेरी शतक ठोकलं, कॉनवेचा वर्ल्ड रेकॉर्ड!

(Mohammad Ashraful admits about match fixing and spot fixing in bangladesh premier league in 2013)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.