AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो आला, त्याने इंग्लंडला झोडलं, पदार्पणात लॉर्ड्सवर षटकाराने दुहेरी शतक ठोकलं, कॉनवेचा वर्ल्ड रेकॉर्ड!

लॉर्ड्सवरच्या लढाईत आमने सामने होते इंग्लंड आणि न्यूझीलंड.. इंग्लंडविरुद्ध पदार्पणातच न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेने (Devon Conway) या झुंजार फलंदाजांने दुहेरी शतक केलंय तेही उत्तुंग षटकार मारुन... (England vs New Zealand Devon Conway)

तो आला, त्याने इंग्लंडला झोडलं, पदार्पणात लॉर्ड्सवर षटकाराने दुहेरी शतक ठोकलं, कॉनवेचा वर्ल्ड रेकॉर्ड!
डेवॉन कॉनवे
| Updated on: Jun 04, 2021 | 6:53 AM
Share

मुंबई : लॉर्ड्सवरच्या लढाईत आमने सामने होते इंग्लंड आणि न्यूझीलंड.. इंग्लंडविरुद्ध पदार्पणातच न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेने (Devon Conway) या झुंजार फलंदाजांने दुहेरी शतक केलंय तेही उत्तुंग षटकार मारुन… आज साऊथ आफ्रिकेच्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दुःखाची आसवं असतील कारण साऊथ आफ्रिकेने डेवॉनला त्यांच्या संघाकडून खेळण्याची संधी दिली नाही. न्यूझीलंडने संधी दिली आणि डेवॉन कॉनवेने न्यूझीलंडने दिलेल्या संधीच सोनं नाही तर हिरे-मोती केले…!  (England vs New Zealand Devon Conway First Batsman Debut match Double hundred With Six)

क्रिकेटच्या पंढरीत खणखणीत दुहेरी शतक

न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर डेवॉन कॉनवेने दुहेरी शतक ठोकलंय. त्यांने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना पहिल्या डावात 345 चेंडूंचा सामना करत 200 रन्स केले आहेत. ज्यामध्ये 22 चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. त्याच्या बॅटमधून निघालेल्या षटकाराने इतिहासाच्या सुवर्णापानांत जागा मिळवलीय.

डेवॉनने षटकाराने आपलं दुहेरी शतक साजरं केलं. पदार्पणाच्या सामन्यात षटकार मारुन दुहेरी शतक साजरं करणारा कसोटी क्रिकेटमधला तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. याशिवाय न्यूझीलंडकडून मॅथ्यू सिनक्लेअर आणि ब्रँडन मॅक्युलमनंतर षटकाारने दुहेरी शतक ठोकणारा कॉनवे तिसरा फलंदाज ठरला आहे.

कॉनवेच्या दुहेरी शतकाने अनेक रेकॉर्ड तोडले!

डेवॉन कॉनवेने आपलं दुहेरी शतक साजरं करताना अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. कसोटी पदार्पणात दुहेरी शतक ठोकणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे. तर न्यूझीलंडकडून दुसरा फलंदाज ठरला आहे. वर्ष 2019 मध्ये दुहेरी शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. तर डाव्या हाताने फलंदाजी करताना दुहेरी शतक झळकवणारा कॉनवे तिसरा फलंदाज ठरला आहे.

संधीचा फायदा कसा उठवायचा हे कॉनवेकडून शिकावं!

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत डेव्हन कॉनवेला टॉम ब्लंडेलच्या जागवर संधी मिळाली होती. त्या संधीचं त्याने अक्षरश: सोनं नव्हे तर हिरे मोती केले. आश्चर्य म्हणजे की ज्या फलंदाजाला 8 डावांत तेवढ्या धावा करता आल्या नाही, तेवढ्या धावा एकट्या कॉनवेने पदार्पणाच्या एका डावांत ठोकल्या. याला म्हणतात संधीचं फायदा घेणं. कॅप्टन केनने त्याला संधी दिली आणि कॉनवेने न्यूझीलंडच्या थिंक टँकच्या अपेक्षेनुसार मनमुराद बॅटिंगचा आनंद लुटला.

(England vs New Zealand Devon Conway First Batsman Debut match Double hundred With Six)

हे ही वाचा :

भारतीय गोलंदाजाच्या वडिलांचं निधन, रवी शास्त्री म्हणाले वडिलांचा आशीर्वाद तुझ्यासोबत, तुला 5 विकेट्स मिळतील

WTC Final : लॉर्ड्सवर खणखणीत शतक, न्यूझीलंडच्या सलामीवीराचं भारताला थेट चॅलेंज

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.