केवळ दिल्लीचं नाही तर येणाऱ्या काळात रिषभ पंत भारताचं नेतृत्व करेन; या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

केवळ दिल्लीचं नाही तर येणाऱ्या काळात रिषभ पंत भारताचं नेतृत्व करेन; या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी
Rishabh Pant

केवळ दिल्लीचंच नाही तर येणाऱ्या काळातjfरिषभ पंत तो भारताच्या कर्णधारपदाचीही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळेल, असं अझरुद्दीन म्हणाले. | Mohammed Azharuddin Prediction Rishabh Pant

Akshay Adhav

|

Apr 01, 2021 | 6:42 AM

मुंबई :  भारतीय संघाचा युवा किकेट कीपर फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) गेल्या काही दिवसांपासून यशाच्या शिखरावर आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात त्याला संघात स्थान द्यावं की नाही, यावरुन वाद होता. मात्र डिसेंबर ते मार्चदरम्यान रिषभ पंतने आपल्या खेळीने अशी काही कमाल केलीय की आता त्याच्याकडे थेट आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) कर्णधार दिलं गेलंय. अशातच भारताचे माजी कर्णधार दिग्गज माजी खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddin ) यांनी रिषभच्या भविष्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. केवळ दिल्लीचंच नाही तर येणाऱ्या काळात तो भारताच्या कर्णधारपदाचीही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळेल, असं अझरुद्दीन म्हणाले. (Mohammed Azharuddin Prediction Rishabh Pant Future India Captain)

सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत दिल्ली कॅपिलल्सच्या कर्णधारपदी रिषभ पंतच्या नावाची घोषणा झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shyeyas Iyer) दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी 23 वर्षांच्या रिषभ पंतवर (Rishabh pant) संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रहाणे, धवन, स्मिथ, अश्विन अशा एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंना पछाडत पंतने बाजी मारली. आयपीएलच्या 14 व्या मोसमात आता दिल्लीचं नेतृत्व रिषभच्या हाती देण्यात आलं आहे.

पंतच्या आक्रमक अंदाजाचा फायदा होईल

रिषभ पंतने स्वत:ला सिद्ध केलंय. आयपीएलमधील इथून पुढचे 2 महिने त्याच्यासाठी आमि त्याच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. कर्णधार नसतानाची रिषभची बॅटिंग कर्णधारपदी खेळताना देखील बघायला मिळेल, अशी आशा संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

रिषभ पंतसाठी मागील काही महिने सर्वोत्तम गेले. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्तम खेळ केला. यात आश्चर्याची गोष्ट नाही की निवड समिती भविष्यात त्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे पाहिल. रिषभच्या आक्रमक अंदाजाच्या बॅटिंगचा भारताला खूप फायदा होईल.

2017 मध्ये रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्ली रणजी फायनलमध्ये

याआधी रिषभ पंतने दिल्ली रणजी संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. पंतच्या कर्णधारपदाच्या काळात 2017 मध्ये दिल्ली रणजीच्या फायनल सामन्यापर्यंत पोहोचली होती. अशाच प्रकारे यावर्षीही पंतकडून अपेक्षा आहे की दिल्लीच्या युवा अनुभवी खेळाडूंना साथीला घेऊन त्याने यावर्षीचा आयपीएल करंकड उंचवावा, अशी अपेक्षा रिषभचे फॅन्स आणि दिल्लीचे चाहते करत आहेत.

(Mohammed Azharuddin Prediction Rishabh Pant Future India Captain)

हे ही वाचा :

एकदिवसीय मालिकांचा हुकमी एक्का ! विराट कोहली ICC ODI रँकिंगमध्ये पहिला

Video : शिखर धवनने यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीसोबत केला भांगडा, व्हिडीओ व्हायरल

VIDEO : दिल्लीच्या कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतर रिषभ पंतचा पहिला व्हिडीओ समोर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें