Video : शिखर धवनने यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीसोबत केला भांगडा, व्हिडीओ व्हायरल

Video : शिखर धवनने यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीसोबत केला भांगडा, व्हिडीओ व्हायरल
शिखर धवन आणि यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा भांगडा करतानाचा व्हिडीओ

शिखर धवनने अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तो आपल्या परिवारासोबत डान्स करताना पाहायला मिळतो.

सागर जोशी

|

Mar 31, 2021 | 6:01 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात गब्बर अशी ओळख असलेला आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत दोन अर्धशतक ठोकणारा शिखर धवन आपल्या मैदानातील तसंच मैदाना बाहेरील एनर्जीमुळे ओळखला जातो. कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान शिखर धवनने अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तो आपल्या परिवारासोबत डान्स करताना पाहायला मिळतो. पण शिखर धवनला भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीसोबत डान्स करण्याची संधी मिळाली तेव्हा तो चांगलाच थिरकला.(Shikhar Dhawan and Yajuvendra Chahal’s wife Dhanashree’s dance video goes viral)

शिखर धवनने धनश्रीसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तो धनश्रीसोबत जोरदार भांगडा करताना दिसतोय. हा व्हिडीओ धनश्रीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय आणि ‘गब्बर के स्टाईल में भांगडा’ असं कॅप्शनही तिने दिलं आहे. या व्हिडीओने रीलमध्येही जोरदार आग लावली आहे. हा व्हिडीओ शिखर धवन आणि धनश्रीच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 3 लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने डेन्टिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्युबर आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेदरम्यान धनश्री चहलसोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर होती. चहल आणि धनश्री मंगळवारी मोहम्मद सिराजसह पुण्याहून RCB च्या कॅम्पसाठी रवाना झाले आहेत.

शिखर धवनने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 98 आणि 67 रन्सची खेळी केली आहे. त्याचा फॉर्म सध्या जोरात आहे आणि तो लवकरच दिल्ली कॅपिटल्ससोबत जोडला जाणार आहे.

इतर बातम्या :

VIDEO : दिल्लीच्या कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतर रिषभ पंतचा पहिला व्हिडीओ समोर

IPL 2021 : रोहित शर्माच्या लेकीने बाबासारखाच सिक्स ठोकला, आईकडून ऋषभ काकाशी तुलना!

Shikhar Dhawan and Yajuvendra Chahal’s wife Dhanashree’s dance video goes viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें