AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यानं कधीकाळी मैदान गाजवलं त्या टीम इंडियाच्या दिग्गजाची वैभव सूर्यवंशीबाबत मोठी भविष्यवाणी, आता तो कायम….

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सध्या भारताच्या टी-20 संघात स्थान मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने वैभवच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत मोठा दावा केला आहे.

ज्यानं कधीकाळी मैदान गाजवलं त्या टीम इंडियाच्या दिग्गजाची वैभव सूर्यवंशीबाबत मोठी भविष्यवाणी, आता तो कायम....
Vaibhav Sooryavanshi Team IndiaImage Credit source: social media
| Updated on: Sep 23, 2026 | 9:46 PM
Share

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या वादळी फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा वैभव सूर्यवंशी सध्या भारताच्या टी 20 संघात जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेत वैभवला फक्त बेंचवरच बसावे लागले. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ज्या भन्नाट फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत, ते पाहता वैभवचे टीम इंडियात पुनरागमन कठीण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याचे यावर थोडे वेगळे मत आहे. कैफने या धडाकेबाज फलंदाजाबाबत एक मोठा अंदाज वर्तवला आहे.

मोहम्मद कैफने असा दावा केला आहे की वैभव सूर्यवंशी येत्या 6 महिन्यांत भारताच्या टी 20 संघात आपली पक्की जागा निर्माण करू शकतो. तिलक वर्मा किंवा शिवम दुबे यांच्या जागी वैभवला अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते आणि तो टी 20 संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो असेही कैफने स्पष्ट केले.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना कैफने सांगितले की तिलक वर्मा जरी उपकर्णधार असला तरी यापूर्वी उपकर्णधारांनाही संघातून डच्चू देण्यात आला आहे. दुसरीकडे शिवम दुबेही सातत्याने चांगली कामगिरी करत नाहीये. त्याचे क्षेत्ररक्षणही फारसे चांगले नसून तो पूर्णपणे अष्टपैलू खेळाडूही नाही कारण त्याच्याकडून फारशी गोलंदाजी करून घेतली जात नाही. तो सध्या फक्त एक फलंदाज म्हणूनच खेळत आहे. त्यामुळे येत्या 6 महिन्यांत तिलक किंवा दुबे यापैकी एकाला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि मग वैभव सूर्यवंशीला नक्कीच संधी मिळेल असा ठाम विश्वास कैफने व्यक्त केला.

कैफने यावेळी वैभवच्या गोलंदाजीचेही विशेष कौतुक केले. दुलीप करंडक स्पर्धेत वैभवने धावा तर केल्याच पण सोबतच तो गोलंदाजी करतानाही दिसल्याचे कैफने निदर्शनास आणून दिले. यामुळे सर्वांना त्याच्यातील एका वेगळ्याच पैलूची ओळख झाली. जर आपण काही षटके गोलंदाजी करू शकलो तर संघासाठी आपण आणखी उपयुक्त ठरू हे आता वैभवलाही चांगलेच समजले असल्याचे कैफने शेवटी सांगितले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी