AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : MS Dhoni संदर्भात महत्वाची बातमी, CSK च्या फॅन्सच वाढलय टेन्शन

IPL 2023 : पहिला सामना गमावणाऱ्या CSK समोर दुसऱ्या मॅचमध्ये आणखी मोठं आव्हान असू शकतं. मागच्या सीजनमध्ये CSK ची टीम पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या नंबरवर होती. चेन्नई सुपर किंग्सला घरच्या प्रेक्षकांसमोर विजय मिळवायचाय.

IPL 2023 : MS Dhoni संदर्भात महत्वाची बातमी, CSK च्या फॅन्सच वाढलय टेन्शन
MS Dhoni Image Credit source: csk Twitter
| Updated on: Apr 01, 2023 | 1:42 PM
Share

IPL 2023 CSK News : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाला कालपासून सुरुवात झालीय. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये पहिला सामना झाला. या रंगतदार सामन्यात हार्दिक पंड्याच्या गुजरातने एमएस धोनीच्या चेन्नईवर लास्ट ओव्हरमध्ये 5 विकेटने विजय मिळवला. सीएसकेसाठी आयपीएल 2023 सीजनची सुरुवात चांगली झालेली नाही. मागच्या सीजनमध्ये CSK ची टीम पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या नंबरवर होती.

यंदाच्या हंगामात ते चित्र बदलेल अशी सीएसकेच्या देशभरातील लाखो चाहत्यांना इच्छा आहे. सीएसकेची सुरुवात पराभवाने झालीय, त्यामुळे सीएसके फॅन्सच्या मनात धाकधूक वाढलीय.

फॅन्सची चिंता वाढलीय

आता सीएसकेच्या फॅन्ससाठी चिंता वाढवणारी आणखी एक बातमी आहे. चेन्नईची टीम जवळपास तीन वर्षानंतर घरच्या मैदानावर चेपॉकवर खेळणार आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्यांचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात चेन्नईच्या फॅन्सना आपल्या लाडक्या माहीला खेळताना पाहण्याची इच्छा आहे.

गुडघ्यावर पडला

पण असं होण्याची शक्यता कमी आहे. एमएस धोनीच्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याबद्दल साशंकता आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात धोनी गुडघ्यावर पडला. त्यावेळी त्याला भरपूर वेदना होत होत्या. पण धोनी त्यानंतरी सामन्यामध्ये खेळला.

फिजियोला मैदानात बोलवाव लागलं

सामन्याचा शेवट जवळ आलेला असताना ही घटना घडली. दीपक चाहर गोलंदाजी करत होता. राहुल तेवतिया स्ट्राइकवर होता. त्यावेळी चेंडू अडवताना धोनीच्या डाव्या पायाला दुखापत झाली. सीएसकेच्या फिजियोला मैदानात बोलवाव लागलं. त्यामुळे छोटा ब्रेक घ्यावा लागला.

सोशल मीडियावर चर्चा

मैदानावर धोनीला त्रास होत असल्याच दिसल्यानंतर तो उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये खेळणार का? अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. सीएसकेचे कोच फ्लेमिंग यांनी धोनीच्या पायात क्रॅम्प आल्याच सांगितलं. कोच फ्लेमिंग यांच्याकडून दुखापतीबद्दल अपेडट

“धोनीच्या गुडघ्याला दुखापत झालेली नाही. फक्त क्रॅम्प आला होता. 15 वर्षापूर्वी धोनीमध्ये जितका वेग होता, तसा स्पीड आता दिसणार नाही. पण तो महान लीडर आहे. बॅटने तो अजूनही योगदान देऊ शकतो. त्याला त्याच्या मर्यादा माहीत आहेत. तो मैदानातील मौल्यवान खेळाडू आहे” असं फ्लेमिंग म्हणाले.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.