AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईला चॅम्पियन केल्यानंतर श्रेयस अय्यर चंद्रकांत पंडीत यांच्याबाबत स्पष्टच म्हणाला

Smat Final Mumbai vs MP Shreyas Iyer On Chandrakant Pandit : श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात मुंबईला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिलं. श्रेयसने या विजयानंतर मध्यप्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली.

मुंबईला चॅम्पियन केल्यानंतर श्रेयस अय्यर चंद्रकांत पंडीत यांच्याबाबत स्पष्टच म्हणाला
Chandrakant Pandit and Shreyas Iyer
| Updated on: Dec 16, 2024 | 5:47 PM
Share

श्रेयस अय्यर याच्यासोबत 2024 या वर्षात काही चांगल्या गोष्टी घडल्या. तसेच कधीच न विसरता येणाऱ्याही घटना घडल्या. श्रेयस अय्यर याला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आलं. तर श्रेयसने त्याच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला 12 वर्षांनंतर ट्रॉफी जिंकून दिली. तर आता 15 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशला पराभूत करत मुंबईला 2022 नंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिलं. श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने ही कामगिरी केली. श्रेयसने या विजयानंतर मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आणि चंद्रकांत पंडीत यांच्याबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

मुंबईने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात एमपीवर 5 विकेट्सने विजय मिळवला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उंचावली. श्रेयसने या विजयानंतर चंद्रकांत पंडीत यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली.

“जेव्हाही चंदू सर आमच्यासमोर असतात तेव्हा आम्ही पराभूत होतो. मात्र आज आम्ही जिंकलो आणि त्यांची जादू संपवली”,असं श्रेयसने म्हटलं. चंद्रकांत पंडीत यांना प्रशिक्षकपदाचा अनेक दशकांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक संघांचं प्रशिक्षकपद सांभाळलं असून त्यांनी अनेकदा चॅम्पियन केलं आहे.

श्रेयस मुंबई टीमबाबत काय म्हणाला?

श्रेयस अय्यरने मुंबईच्या विजयाबाबत बोलताना गोलंदाजांचं कौतुक केलं. श्रेयसने अथर्व अंकोलेकर याचं विशेष कौतुक केलं. “अथर्वने चिवट बॉलिंग करत आम्हाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. तसेच इतर गोलंदाजांनीही चांगलं योगदान दिलं. आमचा लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन कायम ठेवण्याचा प्रयत्न होता. वर्तमानात राहून आणि सकारात्मक विचारसरणीमुळे आम्ही या स्पर्धेत विजयी होऊ शकलो” असं श्रेयसने म्हटलं. अथर्व अंकोलेकर याने या सामन्यात बॉलिंग आणि त्यानंतर बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली. अर्थवने 4 ओव्हरमध्ये 19 धावा देत 1 विकेट घेतली. तर निर्णायक क्षणी 6 बॉलमध्ये 2 सिक्ससह 16 रन्स ठोकत मुंबईला विजयी केलं.

मध्य प्रदेशने मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 17.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर अथर्वसह श्रेयांश शेडगे याने 15 बॉलमध्ये 36 नाबाद धावा ठोकल्या. तर अजिंक्य रहाणे याने 37 धावांची खेळी केली. रहाणेने या हंगामातील एकूण 8 सामन्यांमध्ये 469 धावा केल्या. रहाणेला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.