AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy साठी मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरसह एकूण 103 खेळाडूंची निवड

अर्जुनने नुकतंच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून सिनिअर टीममध्ये पदार्पण केलं होतं.

Vijay Hazare Trophy साठी मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरसह एकूण 103 खेळाडूंची निवड
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर
| Updated on: Jan 31, 2021 | 5:23 PM
Share

मुंबई : मुंबई क्रिकेट संघाने (Mumbai Cricket Association) आगामी विजय हजारे करंडकासाठी (Vijay Hazare Trophy) एकूण 104 संभाव्य खेळाडूंची घोषणा केली आहे. या 104 खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी, अर्जुन तेंडुलकर, श्रेयस अय्यर, ऑलराऊंडर शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, सिद्धेश लाड, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि अरमान जाफर यासारख्या इतर खेळाडूंचा समावेश आहे. एमसीएने (MCA) आपल्या अधिकृत वेबसाईटवर या खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. बीसीसीआयने यंदाच्या मोसमात रणजी स्पर्धा रद्द करुन त्याजागी विजय हजारे स्पर्धा आणि महिलांच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय मालिकेचं आयोजन केलं  आहे. (Mumbai Cricket Association selects 100 players for Vijay Hazare Trophy)

अर्जुन तेंडुलकरला संधी

विजय हजारे स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने नुकतंच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून सिनिअर टीममध्ये पदार्पण केलं होतं. अर्जुनने टीम इंडियासाठी नेट्स बोलरची भूमिकाही बजावली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या सर्व खेळाडूंना मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीत रंगीत कपड्यात 1 फेब्रुवारी 8 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.

देशातील 6 शहरात स्पर्धेचं आयोजन

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विजय हजारे करंडकाचे आयोजन 6 शहरांमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान त्या 6 शहरांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ही स्पर्धा एकूण महिनाभर चालणार आहे. यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व संघ हे फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात बायो बबल वातावरणात प्रवेश करतील. या स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबईची सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत निराशाजनक कामगिरी

मुंबई संघांची गेल्या काही काळापासून निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईचं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. मुंबईला 5 पैकी 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या ढिसाळ कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मुख्य कोच अमित पगनिसने आपल्या पदाचा राजीनामा एमसीएकडे सुपूर्द केला आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021 मध्ये अर्जुन तेंडुलकर चमकणार? लिलावादम्यान टीम्समध्ये चढाओढ होण्याची शक्यता

BCCI | 87 वर्षांची परंपरा खंडित, रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय

(Mumbai Cricket Association selects 100 players for Vijay Hazare Trophy)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.