जेतेपदाच्या हॅट्रीकसाठी मुंबई इंडियन्स सज्ज, असा असेल उर्वरीत IPL चा कार्यक्रम

बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच धमाकेदार सामने दुसऱ्या पर्वातही होणार अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी करत आहेत.

जेतेपदाच्या हॅट्रीकसाठी मुंबई इंडियन्स सज्ज, असा असेल उर्वरीत IPL चा कार्यक्रम
मुंबई इंडियन्स संघ
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 11:53 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL 2021) सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). आतापर्यंत 5 वेळा आय़पीएलचा विजयी खिताब पटकावलेल्या मुंबई इंडियन्स संघाने मागील दोन वर्ष म्हणजे 2019 आणि 2020 साली सलग विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या 2021 च्या आयपीएलमध्येही विजयी होऊन विजयाची हॅट्रीक करण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला आहे.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) शिलेदारांची यंदाच्या आयपीएलची सुरुवात खास झाली नव्हती. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यातील केवळ 4 सामनेच जिंकले आहेत. उर्वरीत 3 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला असून सध्या मुंबईता संघ 8 गुणांसह दिल्ली, चेन्नई आणि आरसीबीनंतर चौथ्या स्थानावर आहे. सध्या शर्मासह सर्व संघ चिंतेत आहे. कारण पहिल्या 7 ही सामन्यात संघ 150 ते 160 च्या दरम्यानच स्कोर उभा करु शकला आहे. केवळ एकाच सामन्यात मुंबईने पोलार्डच्या मदतीने 200 हून अधिकचा स्कोर गाठला होता. तर  मुंबई इंडियन्सच्या उर्वरीत 7 सामन्यांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

– 19 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 23 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 26 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 28 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

उर्वरीत आयपीएल

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली होती. पण कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे 2 मे रोजी आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले. यावेळी 29 सामने झाले होते. तर 31 सामने शिल्लक आहेत. दरम्यान आता बीसीसीआयने हे उर्वरीत 31 सामने युएईत 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल. तर स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला तर एलिमिनेटर 11 ऑक्टोबरला खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना 13 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

हे ही वाचा :

IPL 2021 मध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज, 18 चेंडूत 88 धावा करणारा ‘हा’ महारथी खेळणार कोणत्या संघातून?

रवी भाई आणि रोहितशी बोललो, टी 20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडतोय, विराट कोहलीची पोस्ट जशीच्या तशी

Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!

(Mumbai Indians full schedule of matchces date venue and time for IPL 2021)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.