AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG Live Updates, IPL 2026: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, लखनौ विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

| Updated on: May 04, 2026 | 7:06 PM
Share

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Indian Premier League 2026 Live Updates: आयपीएलच्या 19 व्या मोसमातील 47 व्या सामन्यात पॉइंट्स टेबलच्या तळाशी असलेले 2 संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबईसमोर लखनौचं आव्हान आहे.

MI vs LSG Live Updates, IPL 2026: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, लखनौ विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय
MI vs LSG IPL 2026 Live ScoreImage Credit source: TV9

LIVE Cricket Score & Updates

  • 04 May 2026 07:06 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, रोहितचं कमबॅक, सूर्या कॅप्टन

    मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यातून नियमित कर्णधार हार्दिक पंड्या बाहेर झाला आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे. सूर्याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा याचं कमबॅक झालं आहे.

  • 04 May 2026 07:02 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबईचा कॅप्टन बदलला

    लखनौ विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा कर्णधार बदलला आहे. लखनौ विरुद्ध हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे.  हार्दिकला बरं वाटत नसल्याने तो खेळू शकत नसल्याचं कॅप्टन सूर्यकुमार यादव याने स्पष्ट केलं आहे.

  • 04 May 2026 06:28 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?

    मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. आता नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 04 May 2026 06:21 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबई आणि लखनौची 19 व्या मोसमातील कामगिरी

    मुंबई आणि लखनौ दोन्ही संघांना 19 व्या मोसमात मुंबई आणि लखनौला काही खास करता आलं नाही. मुंबईने 9 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर लखनौला 8 पैकी 2 सामन्यांत विजयी होता आलं आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या आणि लखनौ दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आता कोणता संघ तळाशी राहणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 04 May 2026 06:18 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : लखनौ सुपर जायंट्स टीम

    एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मुकुल चौधरी, हिम्मत सिंग, जॉर्ज लिंडे, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी, मोहसीन खान, अक्षत रघुवंशी, अब्दुल समद, आवेश खान, मणिमरन सिद्धार्थ, जोश इंग्लिस, ॲनरिक नॉर्खिया, मॅथ्यू ब्रिट्झके, अर्जुन तेंडुलकर, शाहबाज अहमद, आकाश महाराज सिंग, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी आणि नमन तिवारी.

  • 04 May 2026 06:16 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), रॉबिन मिंझ, क्रिश भगत, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर, रघु शर्मा, राज बावा, मयंक रावत, शार्दुल ठाकूर, अश्वनी कुमार, रोहित शर्मा, दीपक चहर, क्विंटन डी कॉक, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे, दानिश मालेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

  • 04 May 2026 06:12 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबई विरुद्ध लखनौ आमनेसामने, कोण जिंकणार तिसरा सामना?

    मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स 19 व्या मोसमात तिसऱ्या विजयाच्या शोधात आहेत. दोन्गही संघ 47 व्या सामन्यात आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून असणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 47 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. मुंबईचा हा 10 वा तर लखनौचा नववा सामना आहे. दोन्ही संघांची या मोसमात अत्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईला 9 पैकी फक्त 7 सामनेच जिंकता आले आहेत. तर लखनौचीही तशीच परिस्थिती आहे. मुंबईला घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये 4 पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता उभयसंघातील सामन्यात कोण विजयी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट्स लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Published On - May 04,2026 6:09 PM

Follow Us
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....
राहुरीत अक्षय कर्डिलेंना घवघवीत यश, इतक्या मतांनी विजय
राहुरीत अक्षय कर्डिलेंना घवघवीत यश, इतक्या मतांनी विजय.
5 राज्यांचे निकाल: 3 ठिकाणी सत्तांतर; बॅनर्जींच्या गडावर भाजपचा झेंडा?
5 राज्यांचे निकाल: 3 ठिकाणी सत्तांतर; बॅनर्जींच्या गडावर भाजपचा झेंडा?.
प. बंगालच्या आसनसोलमध्ये उसळली हिंसा, TMC कार्यालयात तोडफोड, नेमकं काय
प. बंगालच्या आसनसोलमध्ये उसळली हिंसा, TMC कार्यालयात तोडफोड, नेमकं काय.
सुनेत्रा पवार यांचा विक्रमी झेंडा; अजित दादांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला
सुनेत्रा पवार यांचा विक्रमी झेंडा; अजित दादांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला.
पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत भाजपची मुसंडी; दिल्लीत जल्लोषाची लगबग
पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत भाजपची मुसंडी; दिल्लीत जल्लोषाची लगबग.