MI vs SRH Live Streaming : हैदराबाद विरूद्धच्या सामन्याची वेळ बदलली? मुंबईची मॅच किती वाजता?
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, IPL 2026 Live Scorecard : मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 स्पर्धेत आपल्या मोहिमेतील आठव्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 2 हात करणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 41 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. मुंबई घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध भिडणार आहे. हैदराबादचा हा नववा तर मुंबईचा आठवा सामना असणार आहे. पॅट कमिन्स हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे पलटणच्या कर्णधारपदाची सूत्र आहेत. मुंबईला गेल्या 6 पैकी 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे मुंबईसमोर हैदराबादला पराभूत करुन कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे पलटणचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे. या निमित्ताने मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कधी?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना बुधवारी 29 एप्रिलला होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर स्मार्ट टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तर https://www.tv9hindi.com/sports/cricket-news या लिंकवर सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येतील.
रोहितचं कमबॅक होणार?
हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याचं कमबॅक होणार का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. रोहितला 12 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. तेव्हापासून रोहित मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर आहे. अशात रोहित परतणार की चाहत्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
दरम्यान उभसंघातील हेड टु हेड आकडेवारी पाहता मुंबई इंडियन्स सनरायजर्स हैदराबादवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. उभयसंघात बुधवारी होणारा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 26 वा सामना असणार आहे. मुंबईने 25 पैकी सर्वाधिक 15 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने मुंबई विरुद्ध 10 सामन्यांत विजय मिळवला आहे.
