AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत-ऑस्ट्रेलियानंतर या संघाची घोषणा, स्टार खेळाडू रोहितकडे कर्णधारपद

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता फक्त एका महिन्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर संघांची घोषणा होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया, भारताने संघ जाहीर केल्यानंतर आणखी एका संघाची घोषणा करण्यात आली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत-ऑस्ट्रेलियानंतर या संघाची घोषणा, स्टार खेळाडू रोहितकडे कर्णधारपद
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत-ऑस्ट्रेलियानंतर या संघाची घोषणा, स्टार खेळाडू रोहितकडे कर्णधारपदImage Credit source: PTI
| Updated on: Jan 07, 2026 | 7:03 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून भारत-श्रीलंकेकडे यजमानपद आहे. या स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना संघांची घोषणा केली जात आहे. भारताने मागच्या महिन्यातच संघ जाहीर केला होता. त्यानंतर एकापाठोपाठ एक संघ जाहीर होताना दिसत आहेत. आता नेपाळने आपला संघ जाहीर केला आहे. नेपाळने 15 सदस्यीत संघाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी खेळाडू आणि तरुण प्रतिभेची सांगड घालण्यात आली आहे. नेपाळने रोहित पौडेलकडे टी20 वर्ल्डकप संघाची धुरा सोपवली आहे. रोहित हा एक अनुभवी फलंदाज आहे आणि त्याने नेपाळला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले आहेत. तर दीपेंद्र सिंह ऐरी हा उपकर्णधार असणार आहे. तर संदीप लामिछाने याचीही संघात नियुक्ती करण्यात आली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडू संदीप लामिछानेलाही संघात स्थान दिलं असून फिरकी विभागाचे नेतृत्व करणार आहे. इतकंच काय तर फिरकीपटू ललित राजबंशी आणि बसीर अहमद यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. दीपेंद्रसह, गुलशन झा, आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांना अष्टपैलू संघात समाविष्ट केलं आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी नेपाळचा संघ

रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी (उपकर्णधार), संदीप लामिछाने, कुशल भुरटेल, आसिफ शेख, संदीप जोरा, आरिफ शेख, बशीर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजबंशी, शेर मल्ला आणि लोकेश बाम.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नेपाळचा संघ क गटात आहे. या गटात बांग्लादेश, इंग्लंड, इटली आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. साखळी फेरीत नेपाळचा संघ एकूण चार सामने खेळणार आहे. नेपाळचा पहिला सामना 8 फेब्रुवारीला इंग्लंडशी होणार आहे. 12 फेब्रुवारीला इटली, 15 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज, 17 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. साखळी फेरीत नेपाळने चांगली कामगिरी केली तर सुपर 8 फेरीत स्थान मिळणार आहे.

समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.