मुस्तफिझुरला काढल्याचा राग! टी20 वर्ल्डकप 2026 बाबत बांग्लादेश घेणार असा निर्णय
बीसीसीआयने आयपीएलमध्ये निवड झालेल्या बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमाना काढून टाकण्याचे आदेश दिले. केकेआरने क्षणाचाही विलंब न करता काढूनही टाकलं. त्यामुळे आता बांग्लादेशमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा परिणाम टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवर होण्याची शक्यता आहे.

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे भारतात संतापाची लाट आहे. भारतात बांगलादेशचा तीव्र विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएल बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याची निवड झाली होती. त्याच्यासाठी 9.2 कोटी बोली लावून केकेआरने संघात घेतलं होतं. पण बीसीसीआयने त्याला काढून टाकण्याचे आदेश दिले. केकेआरने त्याला संघातून काढून टाकलं आहे. इतकंच भारत बांग्लादेश द्विपक्षीय मालिकाही भारतीय संघ खेळणार नाही असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बांगलादेशची नाचक्की झाली. असं असताना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवरही संकट ओढावलं आहे. कारण मुस्तफिझुरला काढल्याने आणि मालिकेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे बांगलादेशची नाचक्की झाली आहे. त्याचा राग टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर काढला जाण्याची शक्यता आता दिसू लागली आहे.इतकंच काय तर बांगलादेशच्या अध्यक्षांनी हा मुद्दा आयसीसीच्या कोर्टात नेण्याचा निर्णय घेतला आहे.
बांग्लादेश टी20 वर्ल्डकप सामने भारतात खेळणार नाही?
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अनिमुल इस्लाम बुलबुलने मीडियाशी बोलताना सांगितलं की, टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत आयसीसीशी चर्चा करणार आहे. त्यांनी सांगितलं की, ‘टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन आयसीसी करते आणि भारताकडे यजमानपद आहे. जर आम्हाला काही बोलायचं असेल तर आम्ही आयसीसीशी बोलू.’ दुसरीकडे, बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाचे पूर्व सल्लागार आसिफ महमून यांनी सांगितलं की, भारतात आयसीसी स्पर्धा भरवण्यासाठी योग्य वातावरण नाही. आसिफ महमूद म्हणाला की, ” एवढ्या धर्मांध देशाने कधीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करू नये. बीसीसीआयला आव्हान देण्यासाठी बीसीबीने सरकार आणि इतर क्रिकेट मंडळांशी संवाद साधावा. भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अयोग्य घोषित केले पाहिजे.”
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशचा संघ क गटात आहे. या गटात बांगलादेशसोबत इंग्लंड, नेपाळ, इटली आणि वेस्ट इंडिज हे संघ आहे. बांगलादेशचे सर्व सामने हे भारतात होणार आहेत. जर त्यांनी पाकिस्तानसारखा निर्णय घेतला तर नियोजन करणं कठीण जाईल. कारण पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहे. बांगलादेशनेही असाच पवित्रा घेतला तर ऐनवेळी धावाधाव करावी लागेल. बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध इडन गार्डनवर होणार आहे. 9 फेब्रुवारीला इटलीविरुद्ध इडन गार्डनवर, 14 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध इडन गार्डनवर, 17 फेब्रुवारीला नेपाळविरुद्ध सामना होणार आहे. नेपाळविरुद्धचा सामना हा सामना वानखेडे स्टेडियमवर होईल.
