Asia Cup 2025 : नेपाळचा एका पराभवामुळे पत्ता कट, आशिया कपसाठी निवड कशी होते?
Asia Cup Qualification Scenario Explainer : आशिया कप 2023 स्पर्धेत नेपाळ क्रिकेट टीम सहभागी होती. नेपाळ तेव्हा रोहित पौडेल याच्या नेतृत्वात खेळली होती. त्यानंतर नेपाळ टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतही सहभागी झाली. मग आशिया कप 2025 स्पर्धेत नेपाळ का नाही? आशिया कप स्पर्धेत कोणत्या संघांना थेट प्रवेश मिळतो आणि कुणाला पात्रता फेरीत खेळावं लागतं? जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेचं बिगूल वाजलं आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यूएईकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. अबुधाबी आणि दुबईतील क्रिकेट स्टेडियममध्येच या स्पर्धेतील सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच यंदा या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. एका गटात 4 यानुसार 2 गटात 8 संघांचा समावेश आहे. या 8 पैकी स्पर्धेसाठी 4 संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई ए ग्रुपमध्ये आहेत. यूएई आणि ओमानने संघ जाहीर केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला हाँगकाँग आणि बांगलादेशने संघ जाहीर केलाय. तर इतर 4 संघ अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेतच आहेत. ...
