AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका धावेसाठी 11 लाख रुपये.. एका विकेटसाठी 6 कोटी रुपये.. पांड्याच्या पगारावरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने या पर्वात निराशाजनक कामगिरी केली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तर दहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यात हार्दिक पांड्याची कामगिरीही निराशाजनक राहिली. त्यामुळे आता त्याला ट्रोल केलं जात आहे.

एका धावेसाठी 11 लाख रुपये.. एका विकेटसाठी 6 कोटी रुपये.. पांड्याच्या पगारावरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!
एका धावेसाठी 11 लाख रुपये.. एका विकेटसाठी 6 कोटी रुपये.. पांड्याच्या पगारावरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!Image Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: May 25, 2026 | 8:55 PM
Share

हार्दिक पांड्या तीन हंगाम मुंबई इंडियन्सनचं नेतृत्व करत आहे. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याला ट्रेड केलं आणि तेव्हापासून सलग तीन वर्षे त्याने मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळली. आयपीएल 2024 पर्वातही मुंबई इडियन्सने 4 सामन्यात विजय मिळवला होता आणि शेवटच्या स्थानी राहिला. त्यानंतर आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. तसेच क्वॉलिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सकडून पराभव झाला आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. आयपीएल 2026 स्पर्धेत पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशा पडली. मुंबई इंडियन्सने या पर्वातही फक्त 4 सामने जिंकले आणि नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे हार्दिक पांड्याचं नेतृत्व आणि त्याची कामगिरी या दोन्ही बाबी चर्चेत आल्या आहेत. अष्टपैलू हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत अपयशी ठरला.

हार्दिक पांड्याला किती रक्कम मिळाली?

मुंबई इंडियन्सने या पर्वातही हार्दिक पांड्याला 16.35 कोटी रुपयांच्या किमतीत कायम ठेवलं होतं. जसप्रीत बुमराहानंतर संघातील दुसरा महागडा खेळाडू होता. या व्यतिरिक्त त्याला प्रति सामना 7.5 लाख रुपये मानधन मिळत होते. म्हणजेत त्याने 10 सामन्यांसाठी अतिरिक्त 75 लाखांची कमाई केली. त्यामुळे यंदाच्या वर्षात त्याची एकूण कमाई 23.85 कोटी रुपये आहे. तसेच या पर्वात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या मानधनातून रक्कम कापली आणि त्याच्या हातात 23.61 कोटी रुपये पडले.

प्रत्येक धाव आणि विकेटसाठी किती खर्च आला?

मुंबई इंडियन्सने इतके पैसे मोजल्यानंतर त्याच्या कामगिरीचं आकलन नेटकऱ्यांनी केलं आहे. त्याने 10 डावात 206 धावा केल्या. आरसीबीविरुद्ध 40 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. म्हणजेच प्रत्येक धावेसाठी हार्दिकला 11.46 लाख रुपये मिळले. तर 9 डावात त्याने फक्त 4 विकेट घेतल्या. तसेच 11.43 च्या सरासरीने धावा दिल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याला प्रत्येक विकेटसाठी 5.90 कोटी मोजले. संपूर्ण हंगामात त्याने टाकलेल्या 136 चेंडूसाठी अंदाजे 17.36 लाख रुपये खर्च आला. त्याला मिळालेला पगार पहिल्यांदा धावांसाठी मोजला गेला. त्यानंतर तेवढाच पगार हा विकेटसाठी मोजला गेला. अष्टपैलू कामगिरीची आकडेवारी काढली तर यात कमी जास्त होईल.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सलग तीन पर्वात मुंबई  इंडियन्सला उतरती कळा लागली. त्यामुळे पुढच्या पर्वात नेतृत्व बदल केलं जाण्याची शक्यता वाढली आहे. जर तसं झालं तर मुंबई इंडियन्सची धुरा कोणाच्या हाती सोपवली जाईल? याबाबत चर्चा सुरू आहे. भविष्याचा वेध घेऊन तिलक वर्माची निवड केली जाऊ शकते.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...