Injury : टी 20i वर्ल्ड कपआधी मॅचविनर खेळाडूला दुखापत, टीमला मोठा झटका
Icc t20 world cup 2026 : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. त्याआधी न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची चाहत्यांनी प्रतिक्षा आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी या स्पर्धेसाठी संघ जाहीर केले जात आहेत. भारत आणि श्रीलंकेत होणार्या या स्पर्धेसाठी यजमान टीम इंडियाने सर्वात आधी 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाने 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघ यंदा ही ट्रॉफी आपल्याकडे कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कपआधी मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय टी 20i मालिका खेळणार आहे. त्याआधी न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली आहे. लॉकी फर्ग्यूसन दुखापतीच्या जाळ्यात अडकला आहे. फर्ग्यूसनला आयएलटी20 (ILT 20) स्पर्धेत डेजर्ट वायपर्स टीमकडून खेळताना दुखापत झाली. त्यामुळे फर्ग्यूसन टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी उपलब्ध असणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
फर्ग्यूसन आयएलटी20 मधून आऊट
फर्ग्यूसनला एमआय एमीरेट्स विरूद्धच्या सामन्यात बॉलिंग करताना दुखापत झाली. फर्ग्यूसनसला दुखापतीमुळे ओव्हर अर्धवट सोडून लंगडत मैदानाबाहेर जाव लागलं. फर्ग्यूसन त्यानंतर या मोसमातून बाहेर झाला. त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी सॅम करन याला देण्यात आली.
न्यूझीलंडच्या डोकेदुखीत वाढ
फर्ग्यूसनला आयएलटी 20 नंतर बीबीएल अर्थात बीग बॅश लीग स्पर्धेत खेळायचं होतं. त्यानंतर लॉकी भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र दुखापतीमुळे आता चिंता वाढली आहे. तसेच लॉकी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी उपलब्ध असणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लॉकी वेळीच दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला नाही तर न्यूझीलंडसाठी हा सर्वात मोठा झटका असेल.
न्यूझीलंड कोणत्या ग्रुपमध्ये?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी एकूण 20 संघांना 5-5 नुसार विभागण्यात आलं आहे. त्यानुसार न्यूझीलंडसह अफगाणिस्तान, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडाचा डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
लॉकी फर्ग्यूसनची टी 20i कारकीर्द
दरम्यान लॉकी फर्ग्यूसन याने न्यूझीलंडचं 43 टी 20i क्रिकेट सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. लॉकीने या 43 सामन्यांमध्ये एकूण 64 विकेट्स घेतल्या आहेत.
