AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs BNG : न्यूझीलंडवर मोठी नामुष्की, अवघ्या 60 धावांत संघ सर्वबाद, बांग्लादेशचा दमदार विजय

न्यूझीलंडचा संघ सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला सामना असणाऱ्या टी-20 सामन्यात बांग्लादेशने न्यूझीलंड संघाच्या फलंदाजाना अगदी सळो की पळो केलं आहे.

NZ vs BNG :  न्यूझीलंडवर मोठी नामुष्की, अवघ्या 60 धावांत संघ सर्वबाद, बांग्लादेशचा दमदार विजय
बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील एक क्षण
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 7:24 PM
Share

ढाका : न्यूझीलंडचा संघ सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये पहिला टी-20 सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात बांग्लादेश क्रिकेट संघाने (Bangladesh Cricket Team) उत्कृष्ट अशा टी-20 खेळाचे प्रदर्शन करत न्यूझीलंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी बांग्लादेशने न्यूझीलंडच्या फलंदाजाना अवघ्या 60 धावांवर ऑलआऊट केलं. बांग्लादेश संघाने नुकतेच ऑस्ट्रेलिया संघाला टी-20 सामन्यांत पराभूत केल्यानंतर आता न्यूझीलंडलाही धोबीपछाड केलं आहे.

सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा संघ पूर्ण 20 ओव्हरही खेळू शकला नाही. बांग्लादेशकडून मुस्तफिजुर रेहमानने सर्वोत्कष्ट गोलंदाजी करत 3 विकेट मिळवले. तर शाकिब अल हसन, नासूम अहमद, सैफुद्दीन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले. ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ अवघ्या 60 धावांवर सर्वबाद झाला.लॅथम (18) आणि निकोल्स (18) या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. 2014 मध्येही श्रीलंका संघाविरुद्ध न्यूझीलंडचा संघ 60 धावांवरच सर्वबाद झाला होता. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा महिला संघही टी-20 फॉर्मेटमध्ये 60 धावांवर सर्वबाद झाला आहे.

बांग्लादेशचा संघ तीन विकेट्सनी विजय

न्यूझीलंडचा संघ बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात खराब झाली. एका धावेवर पहिला विकेट गेल्यानंतर सात धावा झाल्या असताना पुन्हा बांग्लादेशचा आणखी एक विकेट गेला. त्यानंतर मात्र दिग्गज खेळाडू शाकिब अल हसनने डाव सावरत 25 धावांची महत्त्वाची खेळी केली. ज्याच्या जोरावर मुस्तफिकूर रेहमानने डाव शेवटपर्यंत नेत संघाला दमदार विजय मिळवून दिला.

हे ही वाचा :

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

IND vs ENG: चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल, ‘या’ खेळाडूला नेमलं उपकर्णधार

(New zealand Cricket team all out on 60 runs against bangladesh in 1st t20 and won match with 7 wickets)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.