AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : 5 तास 48 मिनटं फलंदाजी करुन केल्या 55 धावा, भारताला विश्वचषकाच्या फायनलपर्यंत पोहोचवलं, बुमराह सारखा धुरंदर बोलर शोधला

या खेळाडूने कसोटी कारकिर्दीत 12 शतकं ठोकली आहेत. ज्यामुळे या 12 शतकांच्या खेळी खेळलेल्या 9 सामन्यांत संघाला सामना अनिर्णीत ठेवण्यात यश आलं.

Birthday Special : 5 तास 48 मिनटं फलंदाजी करुन केल्या 55 धावा, भारताला विश्वचषकाच्या फायनलपर्यंत पोहोचवलं, बुमराह सारखा धुरंदर बोलर शोधला
जॉन राईट
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 12:20 PM
Share

मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात असे काही खेळाडू असतात जे अवघड आणि कठीण परिस्थितीत संघाला कसं सावरयाचं हे शिकवून जातात. अशीच शकवण दिलेला एक माजी क्रिकेटपटू ज्याने सलामीच्या सामन्यात जवळपास सहा तास क्रिजवर राहून 55 धावा ठोकल्या आणि संयमी खेळीने संघाला विजय मिळवून दिला. हा विजयही 47 सामने न पराभूत करु शकलेल्य दिग्गज इंग्लंड संघाविरोधात होता. मैदानावर एक संयमी क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाडूचा भारताविरुद्धचा रेकॉर्डही जबरदस्त होता.  नंतर भारतीय संघाचाच प्रशिक्षक होऊन संघाला तब्बल 28 वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्याची किमया देखील या खेळाडूने केली. तर अशा या बहुगुणी क्रिकेटपटूचे नाव आहे, जॉन राइट (John Wright). न्यूझीलंडचा (New Zealand) माजी सलामीवीर राइट यांचा आज वाढदिवस असून ते 5 जुलै 1954 साली केंटरबरी येथे जन्माला आले होते.

क्रिकेटचे जानकार सांगतात की जॉन राइट यांच्याकडे सर्व प्रकारचे शॉट खेळण्याची क्षमता होती पण ते मुद्दाम काही शॉट खेळत नसत. फेब्रुवारी, 1978 मध्ये इंग्लंड विरोधात वेलिंग्टन टेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात राईट यांनी केली. पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच डावात राईट यांनी 348 मिनटं म्हणजेच 5 तास 48 मिनटं फलंदजी केली. 244 चेंडूत त्यांनी 3 चौकार ठोकत 55 धावांची संयमी खेळी केली. त्यामुळे लो-स्कोर असणाऱ्या या सामन्यातदु दूसऱ्या डावातही राईट यांनी 3 तास क्रिजवर राहत 19 धावा केल्या. राईट यांच्या या चिवट खेळीच्या जोरावरच न्यूझीलंडने इंग्लंडवर 72 धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे 47 टेस्टनंतर न्यूझीलंडने इंग्लंडवर विजय मिळवला होता.

भारतविरुद्ध दमदार रेकॉर्ड

जॉन राइट यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 82 टेस्ट खेळले. ज्यात 37.82 च्या सरासरीने 5 हजार 334 धावा बनवल्या. 185 रन हा त्यांचा सर्वोच्च स्कोर आहे. दुसरीकडे 149 वनडे सामन्यात एका शतकाच्या मदतीने राईट यांनी 3 हजार 891 रन बनवले. कसोटी क्रिकेटमध्ये राईट यांचा भारता विरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त  होता. भारताविरुद्ध राईट यांनी 61.84 च्या सरासरीने 804 धावा केल्या आहेत. तर तीन शतक आणि तीन अर्धशतकं देखील लगावली. 4 हजार धावांचा टप्पा पार करणारे ते पहिले न्यूझीलंडचे फलंदाज होते. 80 च्या दशकात टेस्ट खेळणाऱ्या सर्व देशांविरोदात शतक ठोकण्याचा कारनामा देखील राईट यांनी केला होता.

5 वर्ष टीम इंडियाचे कोच, आता मुंबई इंडियन्ससोबत

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जॉन राइट हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक झाले.  पाच वर्षे कर्णधार सौरव गांगुलीसोबत संघाची रणनीती ठरवत राईट यांनी अनेक विजय भारतीय संघाला मिळवून दिले.ज्यात 2001 ची ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट, पाकिस्तान टेस्ट सीरीज आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलेल्या टेस्टचा समावेश होतो. राईट यांच्याच प्रशिक्षणाखालीच भारतीय संघ 2003 च्या वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहोचला होता. भारताच्या कोचपदावरुन कमी झाल्यानंतर डिसेंबर 2010 मध्ये राईट न्यूझीलंडचे कोच बनले जवळपास दोन वर्षे न्यूझीलंड संघाचे कोच म्हणून राईट यांनी काम पाहिले. सध्या ते आयपीएल संघ (IPL) मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians)  भारतात असतानाच राईट यांनी जसप्रीत बुमराहचा खेळ पाहून त्याला मुबईच्या संघात घेतलं.

हे ही वाचा :

भारतीय संघात मोठे बदलाव होण्याची शक्यता, रवी शास्त्रींच्या जागी द्रविडच्या नावाची चर्चा, कपिल देव यांच मोठं वक्तव्य

मिताली राजचं टीकाकारांना उत्तर, म्हणाली, ‘माझं काम लोकांना खूश करण्याचं नाही!’

Photo : 5 वर्ष संघातून बाहेर, इंग्लंड दौऱ्यात पुनरागमन, अष्टपैलू खेळी करत जिंकली सर्वांचीच मनं

(New Zealand Former Cricketer and indias Former Coach John Wright Birthday Today)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.