Rohit Sharma: ‘नको रे बाबा, मी परत जाड होईल’ केक पाहताच रोहित शर्माची भन्नाट कमेंट; विराट कोहली याला हसूच आवरेना

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर हॉटेलमध्ये भारतीय संघासाठी विजयाचा केक सजलेला होता. हा केक यशस्वी जायसवाल याने कट केला. विराट कोहलीने हा केक खाल्ला पण रोहितने केक खाण्यास नकार देताना भन्नाट कमेंट केली. ती सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली.

Rohit Sharma: नको रे बाबा, मी परत जाड होईल केक पाहताच रोहित शर्माची भन्नाट कमेंट; विराट कोहली याला हसूच आवरेना
विराट कोहली रोहित शर्मा
| Updated on: Dec 07, 2025 | 3:43 PM

Rohit Sharma-Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेला भारताने निर्णायक सामन्यात नमवले. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी केक तयार होता. टीम इंडिया सामना संपवून जेव्हा हॉटेलमध्ये आली. तेव्हा दर्शनी भागातच सजलेले केक तयार होते. विराट कोहलीला केक कापण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा त्याने यशस्वी जायसवाल याला केक कापण्यास सांगितले. यशस्वीने केक कापला. केकचा एक भाग त्याने विराट कोहली याला खाऊ घातला. तर तो रोहित शर्माकडे वळला. तेव्हा रोहित शर्मा याने केक खाण्यास नकार देत एक भन्नाट कमेंट केली आणि तिथे एकच हश्या पिकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

विराट ठरला सर्वोत्तम खेळाडू

विराट कोहली याला दक्षिण आफ्रिकाविरोधातील एकदिवसीय मालिकेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याने 3 सामन्यात एकूण 302 धावा केल्या. कोहलीने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात शतक (135 आणि 102) ठोकले. अखेरच्या सामन्यात त्याने नाबाद 65 धावांची खेळी खेळली. 45 चेंडूच्या या खेळीत कोहलीने 3 षटकार, 6 चौके झोडले. तर त्यापूर्वी यशस्वी जायसवाल आणि रोहित शर्मा याने पहिल्या विकेटसाठी 155 धावांची मजबूत खेळी खेळली आणि विजय निश्चित केला.

‘मी पुन्हा जाड होईल’

रोहित शर्माने गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शारिरीक तंदुरुस्तीवर, फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी तो कठोर परिश्रम घेत आहे. त्याने बरेच वजन घटवले आहे. आपल्या फिटनेसबाबत तो आता अधिक सजग झाला आहे. त्याचा अनुभव विशाखापट्टणममध्ये सुद्धा आला. जेव्हा भारतीय खेळाडू मालिका जिंकून हॉटेलवर आले. तेव्हा तिथे विजयाचा जल्लोष दिसला. एक केकही तयार होता. विराट ऐवजी यशस्वीने हा केक कापला.

यशस्वीने केक कापून पहिल्यांदा विराट कोहली याला खाऊ घातला. त्याने तो खाल्ला. त्यानंतर यशस्वीने रोहित शर्माला केक देऊ केला. तेव्हा त्याने, नको रे बाबा, मी पुन्हा जाड होईल अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर विराट कोहलीसह उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. सगळ्यांनी त्याच्या या कमेंटवर भरभरून दाद दिली.