AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो प्लानमध्ये बसत नाही’, मोहम्मद शमी बद्दल Gujarat Titans चे कोच आशिष नेहरा यांचं मोठं विधान

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) मागच्या महिन्यात संपलेल्या IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन त्याने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सला विकेट मिळवून दिल्या.

'तो प्लानमध्ये बसत नाही', मोहम्मद शमी बद्दल Gujarat Titans चे कोच आशिष नेहरा यांचं मोठं विधान
Mohammed ShamiImage Credit source: Screengrab
| Updated on: Jun 19, 2022 | 2:26 PM
Share

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) मागच्या महिन्यात संपलेल्या IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन त्याने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सला विकेट मिळवून दिल्या. त्यांच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंनी बहुतांश संघांच्या सलामीवीरांना चांगलचं सतावलं. गुजरात टायटन्सच्या टीमचा तो एक प्रमुख आधारस्तंभ आहे. मोहम्मद शमीने दमदार प्रदर्शन केलं, त्यावेळी त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचा (T 20 World cup) नक्कीच विचार केला असणार. आयपीएल 2022 मध्ये त्याच्याबरोबरीने दमदार कामगिरी करणारे उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि आवेश खान या वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली. सध्या चालू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत ते खेळतायत. त्यानंतर आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्येही ते दिसतील. पण मोहम्मद शमीची संघात निवड झाली नाही. आता मोहम्मद शमी संदर्भात गुजरात टायटन्सचे कोच आशिष नेहरा यांनी एक वक्तव्य केलय. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत मोहम्मद शमी टीम इंडियाचा भाग नसेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

शमीकडे भरपूर कौशल्य

यावर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचा मोहम्मद शमी भाग नसू शकतो. पण पुढच्यावर्षी मायदेशात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ व्यवस्थापनाने त्याचा नक्कीच विचार केला पाहिजे, असं गुजरात टायटन्सचे कोच आशिष नेहरा म्हणाले. शमीकडे कौशल्य असून तो वनडे, कसोटीत खेळू शकतो, असं आशिष नेहरा क्रिकबझशी बोलताना म्हणाले. “असं वाटतय की, तो सध्या टी 20 वर्ल्ड कपच्या योजनेचा भाग नाहीय. पण मॅनेजमेंटला त्याची गरज असेल, तर एक गोलंदाज म्हणून त्याची क्षमता आपल्या सर्वांना माहित आहे” असं आशिष नेहरा म्हणाले.

त्याचा नक्कीच विचार करा

“तो टी 20 वर्ल्ड कप मध्ये खेळला नाही, तर मी समजू शकतो. पण तो कसोटी क्रिकेट खेळत राहील. पुढच्यावर्षी होणाऱ्या 50 ओव्हर्सच्या वर्ल्ड कपसाठी त्याचा नक्कीच विचार केला पाहिजे” असं नेहरा म्हणाले.

त्यासाठी शमी हवाच

“यावर्षी जास्त वनडे नाहीयत. आयपीएल नंतर शमी सध्या ब्रेकवर आहे. कसोटी सामन्यानंतर इंग्लंड मध्ये होणाऱ्या 50 षटकांच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत त्याला संधी दिली पाहिजे. इंग्लंड सारख्या अव्वल संघाविरुद्ध तुम्ही वनडे मालिका खेळणार आहात. त्यांना हरवायला तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी तुम्हाला तुमचे सर्वोत्तम गोलंदाज हवे असतील. त्या गोलंदाजांमध्ये मी शमीचा नक्कीच समावेश करेन” असं आशिष नेहरा यांनी सांगितलं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.