AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 स्पर्धेत 1.60 कोटीत विक्री झालेल्या खेळाडूवर चप्पल घालून खेळण्याची वेळ, कारण की…

आयपीएल स्पर्धेत आरसीबीने नुवान तुषारावर डाव लावत आपल्या संघात घेतलं होतं. मात्र अजूनही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून एनओसी मिळालेली नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धेपासून दूर आहे. आता हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसत आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत 1.60 कोटीत विक्री झालेल्या खेळाडूवर चप्पल घालून खेळण्याची वेळ, कारण की...
आयपीएल 2026 स्पर्धेत 1.60 कोटीत विक्री झालेल्या खेळाडू चप्पल घालून खेळण्याची वेळ, कारण की...Image Credit source: PTI
| Updated on: Apr 23, 2026 | 5:25 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीच्या ताफ्यात रूजू होण्यासाठी नुवान तुषाराने सर्वोतोपरी प्रयत्न केले. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या हातापाया पडला. कोर्टाचा दरवाजा ठोठावला. इतकंच काय केस मागे घेत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची माफी मागितली. पण त्याला काही आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी ना हरकरत प्रमाणपत्र मिळालं नाही. आरसीबीने त्याच्यासाठी 1.60 कोटी रूपये मोजले होते. एनओसी न मिळाल्याने आता त्याचं 1.60 कोटींचं नुकसान होणार आहे. असं असताना नुवान तुषारा शाळेच्या मैदानात टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसला. त्याची टेनिस बॉलने केलेली गोलंदाजी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुवान तुषारा सध्या फिटनेसच्या तक्रारीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पण टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण हा व्हिडीओ कधीचा हे सांगणं कठीण आहे. पण त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, नुवान तुषारा हाफ पँटवर पाय चप्पल घालून गोलंदाजी करत आहे. त्याची गोलंदाजी पाहून अनेकांनी फिट असल्याचा प्रतिक्रिया दिल्या आहे. पण श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या फिटनेस टेस्टमध्ये नुवान तुषारा फेल गेला. श्रीलंक क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यासाठी पहिल्यांदा फिटनेस टेस्ट पास करणं गरजेचं आहे. जर तसं केलं नाही तर त्याला परवानगी दिली जात नाही. नुवान तुषारा या टेस्ट फेल गेल्याने त्याला एनओसी नाकारण्यात आली.

आरसीबीची आयपीएल 2026 स्पर्धेतील कामगिरी चांगली आहे. आरसीबीने 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असून 8 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल. असं असताना नुवान तुषाराच्या गैरहजेरीत आरसीबीचा गोलंदाजीचा एक पर्याय कमी झाला आहे. त्यामुळे इतर गोलंदाजांवर भार पडत आहे. नुवान तुषारा जगभरातील टी20 लीगमधील लोकप्रिय गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजीची शैली लसिथ मलिंगासारखी आहे. त्याने 137 टी20 सामन्यात 174 विकेट काढल्या आहेत.

Follow Us
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू