AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK 3rd T20i : पाकिस्तानसाठी करो या मरो स्थिती, न्यूझीलंड विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज

Pakistan Tour Of New Zealand 2025 : न्यूझीलंड दौऱ्यावर असेलल्या पाकिस्तान क्रिकेट टीमला पहिल्या 2 सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सलग 2 सामने गमावले असल्याने पाकिस्तान 5 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे.

NZ vs PAK 3rd T20i : पाकिस्तानसाठी करो या मरो स्थिती, न्यूझीलंड विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज
new zealand vs pakistanImage Credit source: @TheRealPCB X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 18, 2025 | 10:48 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमची न्यूझीलंड दौऱ्यातही हारकिरी कायम आहे. पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर तिसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

उभयसंघातील टी 20i मालिकेला 16 मार्चपासून सुरुवात झाली. न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने पाकिस्तानला 91 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर 92 धावांचं आव्हान हे 61 बॉलमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. त्यानंतर दुसरा सामना मंगळवारी 18 मार्चला खेळवण्यात आला. पावसामुळे हा सामना 15 ओव्हरचा करण्यात आला. पाकिस्तानने समाधानकराक बॅटिंग करत 15 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत विजयी आव्हान हे 11 चेंडू राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 13.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे सलग दुसरा विजय मिळवला. किवींनी यासह मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

तिसरा सामना केव्हा?

पाकिस्तानने सलग 2 सामने गमावेलत. आता मालिकेत आव्हान कायम ठेवायचं असेल तर किमान तिसरा सामना तरी जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा तिसर्‍या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा शुक्रवारी 21 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीम : सलमान आगा (कर्णधार), मोहम्मद हरीस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, खुशदिल शाह, अब्दुल समद, जहंदाद खान, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, मोहम्मद अली, ओमेर युसूफ, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि सुफियान मुकेम.

न्यूझीलंड क्रिकेट टीम : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टीम सायफर्ट, फिन ऍलन, टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल हे (विकेटकीपर), झॅकरी फॉल्केस, कायल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, बेन सीयर्स आणि विल्यम किंवा विल्यम.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच