AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SL : चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगीत तालिम, न्यूझीलंड-श्रीलंका वनडे सीरिज 5 जानेवारीपासून, पहिला सामना कुठे?

New Zealand vs Sri Lanka 1st ODI Live Streaming : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत.

NZ vs SL : चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगीत तालिम, न्यूझीलंड-श्रीलंका वनडे सीरिज 5 जानेवारीपासून, पहिला सामना कुठे?
New Zealand vs Sri Lanka ODI SeriesImage Credit source: blackcaps x account
| Updated on: Jan 04, 2025 | 4:43 PM
Share

श्रीलंका क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. यजमान न्यूझीलंडने टी 20i मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. तर श्रीलंकेने तिसरा आणि अंतिम सामना जिंकत लाज राखली. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही सीरिज रंगीत तालीम आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना कुठे आणि केव्हा होणार? याबाबत जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना केव्हा?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना रविवारी 5 जानेवारीला होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना बेसिन रिझर्व्ह वेलिंग्टन येथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

रविवारपासून वनडे सीरिजचा थरार

वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिशेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचीन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, जेकब डफी, विल्यम ओरोरके, मिचेल हे आणि नॅथन स्मिथ.

वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरिथ असलंका(कॅप्टन), पाथुम निसांका, निशान मदुष्का(विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, चामिंडू विक्रमसिंघे, महीश तीक्षना, जेफ्री वांडरसे, लाहिरू कुमारा, अशिथा फर्नांडो, कुसल मेंडिस, दुनिथ वेललागे, मोहम्मद शिराज आणि एशान मलिंगा.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....