Odean Smith IPL 2022 Auction: जागेवरुन सिक्स मारणाऱ्यांसाठी पंजाबने खर्च केला पाण्यासारखा पैसा

Odean Smith IPL 2022 Auction:

Odean Smith IPL 2022 Auction: जागेवरुन सिक्स मारणाऱ्यांसाठी पंजाबने खर्च केला पाण्यासारखा पैसा
(Pic BCCI)
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 1:58 PM

बंगळुरु: नुकत्याच संपलेल्या  भारत-वेस्ट इंडिजमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ओडीन स्मिथने (Odeam Smith) बॅट आणि बॉलने कमाल दाखवली होती. त्यामुळे IPL 2022 Mega Auction मध्ये त्याच्यावर मोठी बोली लागणं अपेक्षित होतं, आणि घडलं सुद्धा तसंच. ओडीन स्मिथला आपल्या चमूत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसली. त्याची बेस प्राइस एक कोटी रुपये होती. ओडीन स्मिथला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पंजबा किंग्स, (Punjab Kings) लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये स्पर्धा लागली होती. अखेर पंजाबने बाजी मारली. ओडिन स्मिथ पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. वेस्ट इंडिजसाठी टी 20 मध्ये त्याने 2018 सालीच डेब्यु केला होता. पण वनडे पदार्पणासाठी त्याला विलंब झाला. यावर्षी जानेवारी महिन्यात आयर्लंड विरुद्ध त्याने वनडेमध्ये डेब्यू केला.

नुकत्याच संपलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत त्याने गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवली. शिखर धवन, विराट कोहली सारख्या दिग्ग्जांना त्याने आऊट केलं होतं. दुसऱ्या सामन्यात कायरन पोलार्ड दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला संधी मिळाली. त्याने या सामन्यात एकाच षटकात ऋषभ पंत आणि विराट कोहलीची विकेट घेतली. तिसऱ्या सामन्यात त्याने शिखर धवनला बाद केलं.

खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. दुसऱ्या सामन्यात त्याने 24 धावांची खेळी केली होती. भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्याने लांबलचक षटकार ठोकले होते. तिसऱ्या सामन्यात त्याने 36 धावा केल्या. यावेळी त्याने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मजबूत फटकेबाजी केली होती. गोलंदाजी आणि फलंदाजीची त्याची ही क्षमता लक्षात घेऊनचे पंजाबने त्याला 6 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.