World Cup 2023 | टीम इंडियाच टेन्शन वाढलं, एक मोठा खेळाडू रुग्णालयात दाखल
World Cup 2023 | वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने शानदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य टीमला लोळवलं. पण आता टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे.

चेन्नई : टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये चांगली सुरुवात केलीय. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य टीमवर विजय मिळवला. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये विजयी शुभारंभ केला आहे. टीम इंडिया आणि क्रिकेट चाहते यामुळे आनंदात आहेत. पण आता टेन्शन वाढवणारी एक बातमी आलीय. टीम इंडियाच्या एका प्रमुख प्लेयरला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच अभियान सुरु होण्याच्या आधीपासूनच शुभमन गिल आजारी आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्याला डेंग्युची लागण झालीय. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही.
डेंग्युमध्ये शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. शुभमन गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. सावधगिरीच पाऊल म्हणून शुभमनला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. शुभमनची प्रकृती आणखी खराब होऊ नये म्हणून हा निर्णय घेतलाय. शुभमन गिल आता अफगाणिस्तान विरुद्ध सुद्धा खेळणार नाहीय. त्याला रुग्णालयात दाखल केलय. त्यामुळे 14 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
पाकिस्तान विरुद्ध खेळेल का?
डेंग्युमुळे शुभमन गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्याला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलय. पाकिस्तान विरुद्ध त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. सध्याची त्याची स्थिती पाहता, गिल लवकर फिट होईल, असं वाटत नाहीय.
Shubman Gill’s platelet count dropped a bit so he has been hospitalized at a facility called Cauvery in Chennai as a precautionary measure. With 4 days left for Pakistan game, it would be surprising if he gets fit and regains strength to play that game.#IndianCricketTeam
— Kushan Sarkar (@kushansarkar) October 10, 2023
टीम इंडिया सध्या कुठे आहे?
चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी आता नवी दिल्लीत आलीय. पण गिलची प्रकृती बिघडल्याने चेन्नईतच त्याच्यावर BCCI मेडीकल टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. पाकिस्तान विरुद्ध तो खेळेल अशी अपेक्षा आहे. शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. अशावेळी त्याच्यासारख्या प्लेयरच अनफिट होणं हा टीम इंडियासाठी मोठा झटका मानला जातोय.
